श्रीगोंदा पुन्हा एकदा हादरले...भरदिवसा तलवारींचा थरार.. रक्तरंजित हल्ल्यात एक जण गंभीर जखमी!

(AI Image)

प्रशासक न्यूज,दि.११जुलै २०२६

श्रीगोंदा शहर आज एका घटनेने हादरले आहे भरदिवसा एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असून पुढील उपचारासाठी जखमी व्यक्तीला पुण्याला हालवण्यात आले आहे जखमी झालेल्या आणि हल्ला करणाऱ्या व्यक्तींची नेमकी नावे समजू शकली नसली तरी जखमी व्यक्ती चे आडनाव दांगडे असल्याचे समजले आहे 
 सदर व्यक्तीवर चार जणांनी मिळून तलवारीने हल्ला करत त्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला

ही घटना आज दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावर गणपती मळा परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती समजली आहे

हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती आणि हल्लेखोर हे सर्व घुगल वडगाव येथील असल्याची माहिती समजली आहे  

याबाबत काही लोकांकडून समजलेली माहिती अशी की घुगल वडगाव येथील एक जखमी झालेला व्यक्ती आणि त्याच्या भावकीतील काही लोकांचे कुठल्यातरी कारणावरून वाद होते या वादाच्या कारणातून आज हा हल्ला झाल्याची चर्चा आहे

या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की ज्याच्यावर हल्ला झाला तो व्यक्ती आज दुपारी श्रीगोंद्यात मुलीला क्लास ला सोडवण्यासाठी आला होता मुलीला सोडवून तो व्यक्ती परत आपल्या गावी घुगल वडगाव कडे जात असताना श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावरील गणपती मळा परिसरात चार लोकांनी त्याला आडवत त्याच्यावर तलवारीने हल्ला केला हल्ला होताच हा व्यक्ती जीव वाचवण्यासाठी पळत जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घरात घुसला त्या घरात फक्त महिला होत्या हल्लेखोर त्या ठिकाणी येऊन त्या घरात घुसून त्यांनी त्या व्यक्तीवर थेट तलवारीने हल्ला चढवला या जीवघेण्या हल्ल्यात त्या व्यक्तीच्या डोक्याला हाताला कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं सदर व्यक्ती मयत झाल्याचे समजून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला त्यानंतर काही सुज्ञ् लोकांनी गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी श्रीगोंद्यात आणले परंतु हल्ल्यात अतिशय गंभीर जखमी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांला उपचारासाठी पुणे येथे पाठवले आहे प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर चौघे होते त्यातील दोन जणांच्या हातात तलवारी होत्या त्या तलवारीने सदर व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला

भरदिवसा अश्या प्रकारे एका व्यक्तीवर घरात घुसून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे श्रीगोंदा हदरले आहे पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे

श्रीगोंदा पुन्हा एकदा हादरले...भरदिवसा तलवारींचा थरार.. रक्तरंजित हल्ल्यात एक जण गंभीर जखमी! श्रीगोंदा पुन्हा एकदा हादरले...भरदिवसा तलवारींचा थरार.. रक्तरंजित हल्ल्यात एक जण गंभीर जखमी! Reviewed by Prashasak on जुलै ११, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.