प्रशासक न्यूज,दि.२४ फेब्रुवारी२०२६
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव ते कोळगाव दरम्यान माऊली मंदिरा नजिक आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इको कार यांची समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे
यात इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे रा काष्टी वय २२ याच्यासह गाडीतील गजानन जनार्धन पायघन वय ४७,दुर्पा गजानन पायघन वय ३६,वैभव गजानन पायघन वय १९या आई वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून त्या कुटुंबंतील करणं गजानन पायघन वय १३ हा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत पायघन कुटुंबीय हे अकोले जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील मुळ राहणारे आहेत
कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात राहत होते काष्टी येथील मयत चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते आज ते त्यांच्या गावाकडून चिंभळे गावाकडे येत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोळगाव शिवारात माऊली मंदिर परिसरात दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकची घारगाव च्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला समोरून जोराचि धडक बसली यात चार जण मृत्यू पावले आहेत
सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही केली
चालकासह चार जणांचा मृत्यू..आई वडील मुलासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी २३, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी २३, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: