"‘मी तिला मारून टाकलं...’ मित्राला केलेल्या एका फोन कॉलने उघडकीस आले श्रीगोंद्यातील थरारक हत्याकांड!


प्रशासक न्यूज,दि.१७जून२०२६

श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यावरील जंगलात एका तरुणीचा जळत असलेला मृतदेह आज सकाळी मिळून आला घटनास्थळी पोलीस पोहोचले मृतदेह विझवला रस्त्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या काही लोकांनी ही घटना पहिली आणि या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि श्रीगोंद्यात एकच खळबळ उडाली श्रीगोंदे कराची सकाळ आज या धक्कादायक बातमीने उगवली

पण या तरुणीचा खून झाल्याची घटना उघड झाली ते एका फोन कॉल मुळे
श्रीगोंदा शहरातील काळकाई चौकातील शुभम ओहळ हा तरुण आणि मयत तरुणी हे सोबत राहत होते या घटनेबाबात अधिकृत समजलेली प्राथमिक माहिती अशी की,

सोमवारी या तरुणाचा आणि मयत तरुणीचा वाद झाला आणि रागाच्या भरात तरुणाने तरुणीला आधी पाईपने मारहाण केली त्या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यावर तरुणाने या तरुणीच्या डोक्यात कुठल्या तरी वस्तूने जोरदार प्रहार केला यात ती तरुणी जागीच मयत झाली या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणाने घर बंद करून तिथून पळ काढत नगर गाठले तिथे जाऊन आपल्या वडिलांना सदर प्रकार सांगितला त्यानंतर काल मंगळवारी हा तरुण पुन्हा श्रीगोंद्यात आला आणि घाबरून जाऊन आपल्या नगर येथील एका मित्राला मी माझ्या बायकोला मारून टाकल्याचा फोन केला

नगर येथील मित्राने शेवटचा फोन कॉल आपल्याला आल्यामुळे आपण पोलिसांच्या रडारवर येऊ या भीतीने आणि प्रसंगावधान दाखवत तातडीने कोतवाली पोलिसांना त्याला त्याच्या मित्राने केलेल्या फोनची आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली

तोपर्यत या तरुणाने मध्यरात्री पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सदर तरुणीचा मृतदेह वडाळी जंगलात नेवून पेटवून दिला होता

इकडे कोतवाली पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांना या फोन बाबत माहिती देत घटनेची माहिती दिली आणि श्रीगोंदा पोलिसांनी रात्रीच तातडीने सूत्रे फिरवत तात्काळ शुभम ओहळ याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि तुझ्या सोबत राहणारी मुलगी कुठे आहे असे विचारताच त्याने पोलिसांना तरुणीचा मृतदेह जळत असलेल्या ठिकाणी नेले

आणि अश्या प्रकारे या खुनाचा उलगडा झाला सदर तरुणीवर आपले प्रेम होते पण ती माझ्यासोबत नीट राहत नव्हती कौटुंबिक कारणातून आमच्यात सतत वाद व्हायचे तसेच मला तिच्यावर संशय होता या कारणातून रागाच्या भरात तिला मारल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितल्याची प्राथमिक माहिती समजली असून अंतिम तपासात अजून काही खुलासे होण्याची शक्यता आहे

सदर तरुणीच्या मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी तरुणाच्या वडिलांनी मदत केल्याचे निष्पन्न होत असल्यामुळे त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

विशेष म्हणजे या तरुणाने सोमवारीच या तरुणीचा खून केला होता त्यानंतर काल रात्री त्याने तिचा मृतदेह पेटवला घरापासून हा मृतदेह त्याने घटनास्थळा पर्यत कसा नेला याचा पोलीस तपास करत आहेत

*श्रीगोंदा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक...
कोतवाली पोलिसांनी आणि श्रीगोंदा पोलिसांनी त्या फोनची तात्काळ दखल घेतल्यामुळे आरोपी त्यांना घरीच मिळून आले आणि पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतल्यामुळे या खुनाच्या घटनेचा उलगडा होण्यास मदत झाली त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे

सदर प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे सदर घटनेमुळे मात्र श्रीगोंद्यात मोठी खळबळ उडाली आहे 
"‘मी तिला मारून टाकलं...’ मित्राला केलेल्या एका फोन कॉलने उघडकीस आले श्रीगोंद्यातील थरारक हत्याकांड! "‘मी तिला मारून टाकलं...’ मित्राला केलेल्या एका फोन कॉलने उघडकीस आले श्रीगोंद्यातील थरारक हत्याकांड! Reviewed by Prashasak on जून १७, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.