पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीवर अकॅडमीच्या चालक असलेल्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळ जनक आणि संताप जनक घटना श्रीगोंदा शहरात घडली आहे या शिक्षकाने या तरुणीवर फक्त अत्याचारच केला नाही तर तिची बदनामी करण्याची धमकी देत सतत या तरुणीसोबत शरीरिक संबंध ठेवल्यामुळे ही तरुणी गर्भवती राहिली होती त्यानंतर या नराधम शिक्षकाने तिचा गर्भपात घडवून आणला
या गंभीर प्रकारबाबत पीडित मुलीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अत्याचार करणाऱ्या रनर्स
अकॅडमी चा प्रशिक्षक जावेद शेख रा.जकातेनगर,श्रीगोंदा याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे संबंधित अत्याचार करणारा शिक्षक फरार आहे
श्रीगोंदा शहरात पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणारी रनर्स अकॅडमी आहे या अकॅडमी चा आरोपी असलेला जावेद शेख हा शिक्षक याने पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीला प्रशिक्षण देत असताना तिच्यासोबत गैर कृत्य केले त्यानंतर याच गोष्टीचा फायदा घेत तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला
सदर घटनेबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर २०२४ मध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या पायाला दुखापत झाली होती याबाबत तिने तीचा प्रशिक्षक जावेद शेख याला उपचार विचारला असता शेख याने तिला पेडगाव रस्त्यावर प्रशिक्षण देणाऱ्या क्रीडा संकुल च्या जागेवर पहाटे च्या सुमारास बोलावले यावेळी ही तरुणी त्या ठिकाणी गेल्यानंतर शेख याने स्ट्रेचिंग बहान्याने तिला स्पर्श करण्यास सुरुवात केली तरुणीने त्याला विरोध केला असता मी तुझा प्रशिक्षक आहे मला हात लावावा लागतो असे सांगत तरुणीच्या इच्छेविरुद्ध शरीरिक संबंध ठेवले त्यानंतर या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी या प्रशिक्षकाने तरुणीला दिली
त्यानंतर सुद्धा ही तरुणी ग्राऊंडवर गेल्यानंतर शेख याने तिला धमकावत तिच्या वर अत्याचार केले
सदर तरुणी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर या शिक्षकाने तिला गोळ्या देत तिचा गर्भपात केला तरुणीने लग्नाबाबत त्याला विचारले असता तुझा गजवा ये हिंद केला असे जावेद शेख तिला म्हणाल्याचे तरुणीने तक्रारीत सांगितले आहे
*हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*
सदर घटना घडल्यानंतर श्रीगोंदा शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यांनी आज एकत्र येऊन श्रीगोंदा पोलिसांना निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली असून आरोपी अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे
तसेच या आरोपीने अश्या प्रकारे अजून काही तरुणीवर अत्याचार केला असल्यास न घाबरता समोर येण्याचे आवाहन या पदाधिकाऱ्यांनी केले आहे
तसेच या आरोपीला वाचवण्यासाठी सत्तेत सहभागी असलेल्या एका हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाचा पदाधिकारी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत या बाबत संताप व्यक्त केला आहे
अश्या प्रकारे प्रशिक्षकाने विद्यार्थिनी वर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे एकच खलबळ उडाली असून आरोपी जेरबंद करण्याची मागणी होत आहे
पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीवर 'प्रशिक्षका' कडूनच "अत्याचार"
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी ०४, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी ०४, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: