चोरीला गेलेले मशीन 'दोन' वर्ष्यानंतर थेट कर्नाटकातून बेलवंडीत....पोलिसांच्या कारवाईमुळे कानून के हात 'लंबे' होते हे चा प्रत्यय!
प्रशासक न्यूज,दि.२३जानेवारी२०२६
'कानून' के हात बहोत लंबे होते हे अशी हिंदीत एक म्हण आहे म्हणजे पोलिसांनी ठरवलं तर ते एखाद्याला पाताळातुन सुद्धा शोधून काढतील असं म्हंटल जात याचाच प्रत्येय बेलवंडी पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीतून पहायला मिळत आहे
दोन वर्ष्यापूर्वी ३१लाख रुपये किंमतीचा चोरी गेलेल्या हार्वेस्टर चा मोठ्या शिताफीने शोध घेत पोलिसांनी कर्नाटक राज्यात जाऊन हा चोरीला गेलेला हार्वेस्टर परत आणला आहे बेलवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आता कौतुक होत आहे
याबाबत बेलवंडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि दि २१ डिसेंबर २०२३रोजी श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावातील अशोक भाऊसाहेब वागस्कर या शेतकऱ्याचे ३१लाख रुपये किंमतीचे हार्वेस्टर मशीन चिंभळा शिवारातून चोरीला गेले होते त्यानंतर दाखल गुन्ह्यानुसार पोलीस मागील दोन वर्ष्यापासून या चोरीला गेलेल्या हार्वेस्टर चा शोध घेत होते परंतु ते मिळून येत नव्हते
बेलवंडी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी सदर गुन्ह्याचे अवलोकन करत या गुन्ह्याची सगळी माहिती घेऊन या चोरीला गेलेल्या मशीनचा छडा लावायचा ठरवले त्यानुसार त्यांनी पो उप निरीक्षक मोहन गाजरे,पो ना यशवंत ठोंबरे,पो कॉ रवी जाधव,पो कॉ भांडवलकर असे एक पोलीस पथक या प्रकरणाच्या तपासासाठी नेमले
तांत्रिक माहितीच्या आधारे कोल्हापूर व सांगली जिल्यात जाऊन शोध घेतला असता चोरीला गेलेले हार्वेस्टर मशीन कर्नाटक राज्यातील अरबियत वाडी,ता.चाकोडी,जि.बेळगाव या ठिकाणी असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले त्यानंतर बेलवंडी च्या तपास पथकाने त्या गावात जाऊन शोध घेतला असता हे मशीन त्या गावातील भिमु भैरू हिंगलजे याच्याकडे मिळून आले त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने हे मशीन बेलवंडी पोलिसांनी जप्त करून ते कर्नाटकातून थेट बेलवंडी आणले
दोन वर्ष्यानंतर चोरीचे मशीन शोधून दुसऱ्या राज्यात जाऊन ते परत आणल्यामुळे बेलवंडी पोलिसांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
चोरीला गेलेले मशीन 'दोन' वर्ष्यानंतर थेट कर्नाटकातून बेलवंडीत....पोलिसांच्या कारवाईमुळे कानून के हात 'लंबे' होते हे चा प्रत्यय!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २३, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २३, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: