स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...त्या प्रकरणाचा लावला छडा


प्रशासक न्यूज,दि.२२जानेवारी२०२५

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणी दुमाला या गावात दि.१३जानेवारी२०२६ रोजी रात्रीच्या वेळेस विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाली होती चोरट्यानी मंदिरातील गावाकऱ्यांनी बसवलेला महादेवाच्या प्रतिकृतीचा १लाख४८हजार रुपये किंमतीचा १किलो८७३ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा चोरून नेला होता त्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता

मंदिरात चोरी झाल्यामुळे ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर चोरीच्या तपासाला सुरुवात केली

गुन्हे तपास पथकाने या आधी मंदिर चोरीतील गुन्हे करणाऱ्या आरोपिंचा  अभिलेख तपासला तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार भास्कर खेमा पथवे रा.नां दुरी दुमाला ता.संगमनेर याने व त्याच्या साथीदाराने केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराच्या परिसरात सलग चार दिवस जाऊन तपास केला परंतु आरोपी हा सतत बाहेरगावी फिरत असल्याचे त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे सदर आरोपी हा त्याच्या चारचाकी वाहनातून संगमनेर कडून पारनेरच्या दिशेने येणार असल्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत भास्कर खेमा पथवे,राजेंद्र ठकाजी उघडे दोघे रा नांदुरी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे मंदिर चोरीच्या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता सदर चोरी ही संजय भास्कर गावडे रा नांदुरी दुमाला याच्या सोबत मिळून केल्याची कबुली दिली गावडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपिंकडून ५लाख १०रु किंमतीचा चांदीचा मुखवटा,३०हजार रु किंमतीचे दोन मोबाईल फोन,रोख रक्कम.८,४००रु आणि ५२००रु किंमतीची चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली हत्यारे,५लाख रु किंमतीची तवेरा गाडी क्रं एम एच ०४ सीएम ६७१२ असा एकूण
१०लाख ५२हजार६००रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे बरकाईने तपास केल्यानंतर त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड झाले आहेत

*सराईत मंदिर चोर,१७गुन्हे दाखल*

मंदिर चोरीच्या गुन्ह्यात पकडलेला भास्कर पथवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे,नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मंदिर चोरीचे जवळपास १७गुन्हे दाखल आहेत त्याला ताब्यात घेतल्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मोठी मदत होणार आहे

*या पथकाने केली कारवाई*

सदर तपास हा स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार कबाडी यांच्या सह पो उप नि महादेव गुट्टे,पो अंमलदार गणेश लोंढे,विजय पवार संतोष खैरे,फुरकान शेख,दीपक घाटकर,भीमराज खर्से,अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ,रोहित येमुल,आकाश काळे,योगेश कर्डीले,अरुण मोरे या पथकाने केली
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...त्या प्रकरणाचा लावला छडा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...त्या प्रकरणाचा लावला छडा Reviewed by Prashasak on जानेवारी २२, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.