एका गावातील मंदिर चोरी उघड होत नाही तोच...श्रीगोंदा तालुक्यातील घटना!


प्रशासक न्यूज,दि.२२जानेवारी२०२५

श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसात घडणाऱ्या चोरीच्या घटना बघता चोरट्यानी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवल्याचे पहायला मिळत आहे

मागच्या आठवड्यातच श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी या गावात झालेल्या मंदिर चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने आजच छडा लावत मुद्देमालासह आरोपी जेरबंद केले आहेत

त्या घटनेचा छडा लागत नाही तोवरच काल दि २१ रोजी सायंकाळी सात ते आज दि २२रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील बाळूमामा मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

चोरट्यानी मंदिरातील सोन्याचे ४ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,११४५ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका आणि रोख रक्कम असा एकूण २लाख२१हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे
या चोरीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे

सदर चोरीबाबत मंदिराचे पुजारी हनुमंत सुभाष ठाणगे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

वरील ठिकाणी असलेल्या बाळूमामा मंदिराचे कुलूप तोडत चोरट्याने मंदिरात प्रवेश करत सदर मुद्देमाल चोरून नेला आहे 

घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे,बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पो निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी भेट देत तपासाची चक्रे फिरवली आहेत 

श्रीगोंदा तालुक्यात सुरु झालेल्या या मंदिर चोरीचे सत्र थांबवण्याचे आता पोलिसांसमोर आवाहन असणार आहे 
एका गावातील मंदिर चोरी उघड होत नाही तोच...श्रीगोंदा तालुक्यातील घटना! एका गावातील मंदिर चोरी उघड होत नाही तोच...श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on जानेवारी २२, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.