प्रशासक न्यूज,दि.१६फेब्रुवारी२०२६
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण राज्यात नावलौकिक असलेल्या श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांचा यात्रोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे असे असून सुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे बघायला मिळत आहे श्रीगोंदा तहसील,पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाकडून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अजून कुठलीही बैठक घेतलेली नाही,ना कुठल्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हालचाली दिसून येत आहेत एवढा मोठा यात्रा उत्सव होत असताना कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक बैठक होणे गरजेचे असून सुद्धा प्रशासन मात्र अजून डोळे मिटून बसल्याचेच चित्र पहायला मिळत आहे
शेख महंमद महाराज यांच्या यात्रोत्सवासाठी श्रीगोंदा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक श्रीगोंद्यात येतात त्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारी म्हणून यात्रा कमिटी शांतता कमिटी पाळणा व्यावसायिक नागरिक यांची एकत्रित बैठक आयोजित करणे जरुरी असताना सुद्धा प्रशासन मात्र या यात्रा उत्सवापासून अनभिज्ञ असल्यासारखे दिसत आहे
त्यातच आता दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील यात्रेत लावण्यात येणारे विनापरवाना पाळणे,आकराण्यात येणारे पाळण्यांचे अवास्तव दर हा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे याबाबत आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार,पोलीस निरीक्षक आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत,तालुकाध्यक्ष श्याम जरे,उपाध्यक्ष दिलीप लबडे,संघटक संतोष आरडे मेजर,आरपीआआय तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप,युवराज पळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
निवेदनात प्रामुख्याने विनापरवाना लावले जाणारे पाळणे त्यातून नागरिकांच्या सुरक्षेकचा निर्माण होणारा प्रश्न यासह शांतता कमिटी,पाळणा व्यावसायिक,यात्रा कमिटी आणि नागरिकांची तातडीने बैठक आयोजित करून पाळणा दर माफक ठेवण्याबाबत चर्चा करण्यात यावी. तसेच पाळण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेने आरेखन करून जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून प्रशासनाचा महसूल बुडणार नाही तसेच पाळण्याचे दर नियंत्रित राहून गोरगरीब यात्रेकरूंची आर्थिक लुट होणार नाही. पाळणा चालकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक करावे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन आणि इतर सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध कराव्यात. परिसरात स्वच्छता ठेवावी. विनापरवाना बिगरशेती जागेवर (अकृषक जागा) पाळणे लावल्यास संबंधित जागा मालकांवर गुन्हे दाखल करून त्या जागेची सनद रद्द करण्यात यावी. नगरपरिषदेच्या मालकीच्या रस्ते, ओपन स्पेस काही दलालांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेवून व्यावसायिकांना चढ्या दराने भाड्याने दिल्या आहेत. अशा कोणत्याही जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा पाळणा अगर दुकाने लावण्यास मनाई करण्यात यावी. तसेच तसे झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी असे मुद्दे समाविष्ट आहेत
उपरोक्त मागणी अन्वये कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाविरोधात समविचारी पक्ष,संघटना आणि नागरिकांना सोबत घेवून शुक्रवार दि. २०/०२/२०२६ रोजी तहसिल कार्यालयासमोर आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे
सदर निवेदनावर सुयोग धस,सद्दाम शेख, प्रदिप ढवळे,अजिनाथ मोतेकर,यशवंत पोटे, मोहसीन शेख, गणेश काळे,अल्ताफ शेख,सागर मधुकर बोरुडे आणि धनराज इंगळे आदि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत
"यात्रा" तोंडावर..'प्रशासन' मात्र अजूनही सुस्त.. हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १६, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १६, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: