प्रशासक न्यूज,दि.१७फेब्रुवारी२०२६
आपल्या भावाला कामावर जाण्यासाठी सोडवायला जात असताना भरधाव निघालेल्या पिकअप ने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात होऊन त्यात दोन सक्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात घडली आहे
सदर अपघातात काष्टी गावातील गजाननवाडी येथे राहणारे सचिन शिवाजी माने वय-४१ आणि त्यांचे मोठे बंधू संतोष शिवाजी माने वय ४५ या दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सचिन माने हे पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथे एका कंपनीत कार्यरत होते त्यांच्या कंपनीची बस काष्टी गावातील दत्त मंदिर परिसरात येणार असल्यामुळे सचिन यांना कामावर जाण्यासाठी बस च्या ठिकाणापर्यत सोडवण्यासाठी त्यांचे मोठे बंधू संतोष हे दुचाकीवरून सचिन यांना सोबत घेऊन सोडवायला जात असताना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास काष्टी गावात नगर दौंड रस्त्यावर श्रीगोंदा चौकात माने बंधू यांच्या दुचाकीला दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या एका भरधाव पिकअप ने जोराची धडक दिली या धडकेत गंभिर जखमी झालेल्या माने बंधू यांचा करून अंत झाला या अपघाती घटने मुळे काष्टी गावावर शोककळा पसरली आहे
या अपघातानंतर काष्टी ग्रामस्थ आक्रमक झाले असून श्रीगोंदा चौक,अजनूज चौक आणि विद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नारायण पाचपुते आणि जालिंदर नाना पाचपुते यांनी केली आहे गतिरोधक बसवून होणारे अपघात टाळल्यास तीच या दोघा माने बंधूना श्रद्धाजली ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे
दोघा भावांवर काळाचा घाला..श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना!
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १६, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १६, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: