प्रशासक न्यूज,दि.१९फेब्रुवारी२०२६
मुलाचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव या ठिकाणी दि१६/०१/२०२६रोजी रात्री घडली होती या हल्ल्यात त्या गावातील भाऊसाहेब नामदेव राजपूत हे मयत झाले होते त्यानंतर त्यांच्या पत्नी दया राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश किरास चव्हाण,शैला महेश चव्हाण,मनसूख विश्रांती चव्हाण,निखिल अनिल शिंदे सर्व रा आढळगाव,आयुर ईश्वर भोसले रा श्रीगोंदा,योगेश युवराज काळे रा बिटकेवाडी या आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील काही आरोपी जेरबंद करण्यात आले होते परंतु मुख्य आरोपी फरार होते ते जेर बंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आता यश आले असून या खून प्रकरणातील मुख्य आरोपी महेश किरास चव्हाण वय २५ आणि त्याची शैला महेश चव्हाण वय २७ या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर येथील जामखेड रस्त्यावरील हत्ती बारव या भागातून ताब्यात घेतले आहे यातील महेश चव्हाण हा सरांईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पो उपनिरीक्षक महादेव गुट्टे,पो उपनिरीक्षक समीर अभंग,पो अंमलदार विजय पवार,अमृत आढाव,योगेश कर्डीले,प्रशांत राठोड,सोनल भागवत,चालक भगवान धुळे या पथकाने केली
सदर घटनेची हकीगत अशी कि दि.१६जानेवारी २०२६ रोजी शुभम राजपूत याचे आढळगाव या ठिकाणी आरोपी महेश चव्हाण सोबत किरकोळ वाद झाला होता त्या वादातुन वरील सर्व आरोपीनी शुभम याच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली त्यावेळी शुभम चे वडील भाऊसाहेब राजपूत हे वाद सोडवण्यासाठी मध्ये गेले असता आरोपी महेश चव्हाण याने त्याच्या हातातील धारधार शस्त्राने भाऊसाहेब यांच्या छातीत वार करून त्यांना गंभीर जखमी केले त्यानंतर उपचारा दरम्यान राजपूत यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर यातील महेश चव्हाण आणि शैला चव्हाण हे फरार होते मुख्य आरोपी सापडत नसल्यामुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी सोमवार पासून आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता त्यामुळे पोलिसांवर आरोपी अटक करण्याचा दबाव वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने व्यावसायिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारा मार्फत हे आरोपी जेरबंद केले आहेत
अखेर 'स्थानिक गुन्हे शाखेला' यश..त्या प्रकरणातील दोघे आरोपी जेरबंद
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १९, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १९, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: