प्रशासक न्यूज,दि.१९ऑक्टोबर२०२५
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र बाबुराव खेडकर वय ५०वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहेअपघाताबाबत नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार खेडकर हे आज सायंकाळच्या सुमारास दुचाकी वरून ढोकराई फाटा तें इनामगाव या रस्त्याने जात असताना वांगदरी गावच्या शिवारात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत खेडकर यांचा जागीच मृत्यू झाला राजेंद्र खेडकर हे पेडगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत त्यांच्या अशा अचानक झालेल्या अपघाती निधनाने पेडगाव गावावर शोककळा पसरली आहे
माजी ग्रामपंचायत सदस्याचा अपघातात मृत्यू.. श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर १९, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर १९, २०२५
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: