ऐन सणासूदीच्या तोंडावर श्रीगोंद्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...


प्रशासक न्यूज,दि.१९ऑक्टोबर२०२५

श्रीगोंदा शहरात रविवारी दिवाळी सणाच्या खरेदीची लगबग सुरू असताना पिसाळलेल्या कुत्र्याने चार नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे

पहिली घटना शहरातील एका हॉटेलसमोर घडली असून दुसऱ्या व्यक्तीला दुकानात चढत असताना कुत्र्याने चावा घेतला. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्यांच्या मुलालाही चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत पेडगाव येथील नवनाथ सुदाम मोहिते, नवनाथ नगर येथील युवराज राजू बिबे,तसेच इतर दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. राजू पाटील मोटे यांनी युवराज बिबे यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले नंतर सर्वांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, नगर येथे हलवण्यात आले आहे.

नागरिकांचा आरोप आहे की, श्रीगोंदा नगरपरिषदेने मोकाट कुत्रे व जनावरांवर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. योग्य वेळी कारवाई झाली असती, तर अशी वेळ आली नसती.

मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे हे उद्या नगरपरिषदेत जाऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन सादर करत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत
ऐन सणासूदीच्या तोंडावर श्रीगोंद्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण... ऐन सणासूदीच्या तोंडावर श्रीगोंद्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण... Reviewed by Prashasak on ऑक्टोबर १९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.