"गौरी" शुगर च्या त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड!


प्रशासक न्यूज,दि.१८ऑक्टोबर२०२५

ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांचे नेतृत्वाखाली हिरडगाव येथील गौरी शुगरने गेल्या गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊस बिलापोटीचा दुसरा हप्ता २०१ रु मे टन प्रमाणे बॅकेत वर्ग केला आहे शिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळपाच्या प्रमाणात १० ते १०० किलो साखर मोफत देऊन दिवाळी गोड केली आहे अशी माहिती कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी दिली

ओमराजे बोत्रेपाटील पुढे म्हणाले कि गौरी शुगरने सन २०२३-२०२४ या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाला ३००६ रु नी अंतिम दिला होता सन २०२४-२०२५ मध्य गाळप केलेल्या ऊसास प्रतिटन ३१०१ रु भाव देण्याचे धोरण घेतले आहे. ओंकार ग्रुपची स्थापना ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत भाव आणि कामगारांना आर्थीक न्याय देण्याच्या भावनेने काढली आहे आता ओंकारची १६ साखर कारखाने झाले आहेत. यातील बहुतेक साखर कारखाने हे आडचणीत होते माझे वडीलांनी आडचणींना संधी मानुन काम करणे आणि निर्णय घेण्याचे संकल्प केला. त्यानुसार काम चालू आहे या यशात साखर व्यवसायातील अधिकारी कामगार तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांचे मोठे योगदान आहे. ओंकार ग्रुपची साखर व्यवसायात कुणाशीही स्पर्धा नाही फक्त ऊसाला चांगला भाव देणे त्यासाठी काटकसरीने कारभार एवढेच धोरण आहे असेही बोत्रेपाटील म्हणाले.
"गौरी" शुगर च्या त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड! "गौरी" शुगर च्या त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर १८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.