"अधिकाऱ्या" पाठोपाठ कर्मचाऱ्याची तक्रार.. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद!


प्रशासक न्यूज,दि.१८ऑक्टोबर२०२५

दोन दिवसांपूर्वी बेलवंडी येथील महावितरण कार्यालयात महावितरण चे सहायक अभियंता तायडे व राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब नाहटा यांच्यात चांगलाच वाद झाला होता वीज प्रश्नावर नाहटा आक्रमक झाले होते त्यानंतर नाहटा यांनी तायडे यांना शिवीगाळ करत त्यांना बूट मारण्याचा प्रयत्न केला होता या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर तायडे यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब नाहटा यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण होऊन अजून दोन दिवस उलटलेले नसतानाच काल दि१७रोजी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसिचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तिसरा गुन्हा बाळासाहेब नाहटा यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे
याबाबत बेलवंडी वीज वितरण कार्यालयातील कर्मचारी अमित रमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज्य बाजारसमिती सभापती बाळासाहेब नाहाटा आणि लोणीव्यंकनाथ येथील अनिल खेडकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या बाबत वीज वितरण कर्मचारी अमित पवार यांनी फिर्यादित म्हंटल्या प्रमाणे दि१६ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पवार हे कर्तव्यावर असताना अनिल खेडकर यांनी फोन करून पवार यांना लोणीव्यंकनाथ ग्रामपंचायत कार्यालयात बोलावलं वीज कर्मचारी पवार हे लोणी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता तिथे अनिल खेडकर,बाळू उर्फ प्रवीण नाहाटा,दादा आल्हाट,पवार नामक व्यक्ती आणि एक अनोळखी इसम असे तिथे कार्यालयात बसले होते त्यावेळी तुम्ही लाईट उशिरा सोडता लवकर का सोडत नाही असा सवाल अनिल खेडकर यांनी वीज वितरण कर्मचारी पवार यांना विचारला त्यावर पवार यांनी लाईट चालू बंद करण्याचे टाईम टेबल वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त होते त्यानुसार उपकेंद्रातून लाईट चालू बंद केली जाते असे सांगितले त्यानंतर खेडकर यांनी तुम्ही जाणूनबुजून मला जास्त लाईट बिल लावता असे म्हणत पवार यांना त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अटकावं केला त्यानंतर दुपारी तीन वाजता बाळासाहेब नाहटा यांनी मोबाईल वर फोन करून पवार यांना ग्रामपंचायत मध्ये झालेल्या वादातून जर पोलिसांकडे तक्रार केली तर गाठ माझ्याशी आहे असे म्हणत दमबाजी केली त्यानंतर काल वीज वितरण कर्मचारी पवार यांनी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनिल खेडकर व बाळासाहेब नाहाटा या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे
"अधिकाऱ्या" पाठोपाठ कर्मचाऱ्याची तक्रार.. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद!  "अधिकाऱ्या" पाठोपाठ कर्मचाऱ्याची तक्रार.. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर १८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.