प्रशासक न्यूज,दि.१७ऑक्टोबर२०२५
राज्य कृषीउत्पन्न बाजारसमितीचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाळासाहेब नाहाटा यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करणे शासकीय कामात अडथळा आणणे आणि अधिकाऱ्याला बूट फेकून मारल्या प्रकरणी विविध कलमानुसार काल रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे
बेलवंडी वीजवितरण कार्यालयातील सहायक अभियंता सुशील रामभाऊ तायडे यांच्या फिर्यादीवरून नाहटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लोणीव्यंकनाथ गावातील चौथऱ्याच्या बांधकामाच्या वादातुन नाहाटा यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या घटनेला पंधरा दिवस उलटत नाहीत तोच काल दुसऱ्यांदा परत ऍट्रॉसिटी नुसार नाहाटा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे
बेलवंडी पोलीस ठाण्यात तायडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे कि काल दि १६रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास नाहटा यांनी आधी त्यांच्या मोबाईलवरून फोन करून तायडे यांना दमदाटी केली त्यानंतर बेलवंडी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील सहायक अभियंता यांच्या दालनात चार तें पाच लोकांना सोबत घेऊन येत बाळासाहेब नाहाटा यांनी तायडे यांना त्यांच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर एकेरी भाषा वापरत शिवीगाळ केली त्यानंतर नाहटा यांनी तायडे यांना बूट फेकून मारला तायडे हे एक मागासवर्गीय अधिकारी असल्याचे माहित असून सुद्धा त्यांना सर्वांना समोर अपमानित करून बूट फेकून मारत अधिकाऱ्यावर दबाव आणून सरकारी कामकाजात अडथळा आणला अशी फिर्याद तायडे यांनी नोंदवली आहे
*शासकीय अधिकाऱ्यांच्या उर्मटपणाबद्दल नाराजी*
अधिकाऱ्याला बूट फेकून मारल्याच्या प्रकरणा नंतर श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी हे देखील
सामान्य लोकांचे ऐकून घेत नाहीत त्यांना उद्धट बोलतात अश्या देखील प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत तसेच महावितरणच्या कारभारा बाबत सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
असे असले तरी शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे बूट फेकून मारणे उचित नसल्याचे मत देखील व्यक्त होत आहे
"नेत्याचा" पारा चढला अन.....अधिकाऱ्याला बूट फेकून मारला....गुन्हा दाखल!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर १६, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर १६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: