प्रशासक न्यूज,दि. ७ऑक्टोबर२०२५
श्रीगोंदा तालुक्याला आता पूर्णवेळ मामलेदार अर्थात तहसीलदार मिळाले आहेत सध्याचे श्रीगोंद्याचे प्रभारी तहसीदार सचिन डोंगरे यांचीच श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या नियुक्तीचा नियमित आदेश आज मंत्रालयातून पारीत करण्यात आला आहे
सचिन डोंगरे हे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदार(संगायो)म्हूणन नियुक्त होते त्यांच्याकडे श्रीगोंद्याच्या तहसीलदार पदाचा प्रभारी पदभार होता आता त्यांचीच श्रीगोंद्याचे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली असून त्याबाबत आज मंत्रालयातून आदेश पारीत झाला आहे
ख्रिश्चन समाजाच्या विकासासाठी असणाऱ्या मिशन बंगला येथील जमिनीच्या परस्पर विक्री प्रकरणात दोषी धरत तत्कालीन तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना निलंबीत करण्यात आले होते तेव्हापासून श्रीगोंद्याला नवीन कोण तहसीलदार मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते आज डोंगरे यांची नियुक्ती झाल्यामुळे तहसीलचे प्रभारी राज संपूष्टात आले आहे
*तहसील डोंगरे यांच्या समोर समस्यांचा डोंगर*
डोंगरे यांचा आज तहसीलदार म्हणून नियमत आदेश झाला असला तरी मागील काही दिवसांपासून तें श्रीगोंद्याचे प्रभारी तहसीलदार म्हणून कामकाज सांभाळत आहेत तहसील मधील बेशिस्त कारभार नागरिकांना किरकोळ कामासाठी मारावे लागणारे हेलपाटे सामान्य नागरिकांची तहसील कार्यालयात होणारी अवहेलना महसूल कर्मचाऱ्यांची मनमानी या सर्व गोष्टी विचारात घेता तहसीलदार डोंगरे यांच्या समोर काम करताना समस्यांचा डोंगर उभा ठाकणार आहे त्यामुळे सचिन डोंगरे यांना सक्षम कारभार करून सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा लागणार आहे

पूर्णवेळ तहसीलदार मिळाल्यामुळे आता तरी महसूलच्या कामाना गती मिळणार का? इथून मागच्याच गोष्टींची पुन रावृत्ती होणार हे येणाऱ्या काळातच समजणार असले तरी स्वच्छ पारदर्शक कारभार करण्याची मोठी जबाबदारी डोंगरे यांच्यावर असणार आहे
..अखेर श्रीगोंद्याला मिळाले पूर्णवेळ "मामलेदार"... नवीन मामलेदारांसमोर समस्यांचा "डोंगर"!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०७, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: