प्रशासक न्यूज,दि.७ऑक्टोबर२०२५
विशाल अ चव्हाण
श्रीगोंदा नगरपरिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय नेत्यांसह सामान्य मतदारांचे देखील लक्ष लागले होते श्रीगोंद्याचे नगराध्यक्ष पद यावेळेस अनुसूचित जाती साठी आरक्षित होईल असे आडाखे काही जणांकडून बांधले जात होते त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरु होती काल मुंबईत नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला श्रीगोंद्याचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आणि सर्वच इच्छुकांचा जीव भांड्यात पडला त्याचबरोबर आरक्षणावरून मतदारांच्या मनात असणारा सस्पेन्स सुद्धा काल संपूष्टात आला
*मतदारांची होणार आर्थिक दिवाळी*
२०१९साली झालेली श्रीगोंदा नगरपरिषदेची निवडणूक आणि त्यात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यापासून ते निवडणूक निकाल लागेपर्यत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडी विजयश्री संपादन करण्यासाठी झालेली मोठी रस्सीखेच आणि त्यातून मतदारांची झालेली चांदी हे सर्वश्रुत आहे
त्यातच आता पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा असून हे पद खुले झाल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असणार यात शंका नाही त्यामुळे यावर्षी च्या निवडणुकीत दिवाळी नंतर पुन्हा मतदारांची आर्थिक दिवाळी होणार हे निश्चित
२०१९साली झालेली श्रीगोंदा नगरपरिषदेची निवडणूक आणि त्यात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यापासून ते निवडणूक निकाल लागेपर्यत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडी विजयश्री संपादन करण्यासाठी झालेली मोठी रस्सीखेच आणि त्यातून मतदारांची झालेली चांदी हे सर्वश्रुत आहे
त्यातच आता पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा असून हे पद खुले झाल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असणार यात शंका नाही त्यामुळे यावर्षी च्या निवडणुकीत दिवाळी नंतर पुन्हा मतदारांची आर्थिक दिवाळी होणार हे निश्चित
*भाजपची ताकद मोठी पण तुल्यबळ उमेदवाराची गरज*
श्रीगोंद्यात सध्या भाजप ची ताकद मोठी आहे भाजपकडे इच्छुक उमेदवार देखील जास्त असले तरी आजच्या परिस्थितीत भाजपला नगराध्यक्षपदा च्या मैदानात तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावा लागणार आहे भाजपकडून सध्या बापू तात्या गोरे,नानासाहेब कोथिंबीरे,अशोक खेँडके, शहाजी खेतमाळीस,सुनीता खेतमाळीस यांची इच्छुक उमेदवारां मध्ये नावे चर्चेत आहेत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची कार्यपद्धती आणि शहरात असलेली त्यांची ताकद बघता इतर पक्षातील अनेकजण भाजप मध्ये जाऊन निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत परंतु त्यांना आमदार पाचपुते यांनी वेटिंग वर ठेवल्याचे चित्र आहे भाजपकडून निवडणूक लढवण्यास अनेकजण इच्छुक असले तरी यावेळी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेवर पूर्णपणे आमदार विक्रम पाचपुते यांची पकड असणार आहे तसेच आ. विक्रम पाचपुते यांची राजकीय कार्यपद्धती पाहता पाचपुते धक्कातंत्र वापरून ऐनवेळी नवीन चेहेऱ्याला संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही
*पाचपुतेंना खिंडीत गाठण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी एकवटणार?*
त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडे सध्या तरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची वाणवा दिसून येते काही महिन्यांपूर्वीच माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे तर सर्व पाचपुते विरोधक राजेंद्र नागवडे,राहुल जगताप,घनश्याम शेलार हे सर्व नेते राष्ट्रवादी पक्षात एकवटले आहेत त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत पाचपुते यांना खिंडीत गाठण्यासाठी शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची युती होण्याची दाट शक्यता असून त्याबाबत नेत्यांची चर्चा झाली असल्याचे खात्रीशीर माहिती समजतं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी युती करून मनोहर पोटे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु असल्या तरी त्याला नागवडे व जगताप गटाकडून सध्या मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी सतीश मखरे,सुधीर खेडकर हे देखील इच्छुक आहेत ऐनवेळी राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला अडचण आल्यास मनोहर पोटे हे शिंदेंच्या शिवसेनेचा स्वतंत्र प्यानेल करण्याच्या तयारीत असल्याचे देखील समजतं आहे
*भोस यांची भूमिका महत्वाची*
२०१९साली धक्कातंत्र वापरणारे आणि सध्या सक्रिय राजकारणापासून अलिप्त असणारे जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांची या निवडणुकीतील भुमिका ही महत्वाची असणार आहे भोस हे कुणासोबत राहून कुणाच्या पाठीवर थाप टाकतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे
*तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता*
सध्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट),शिवसेना(शिंदेगट) विरुद्ध भाजपा अशी होणार असे आज जरी चित्र असले तरी आणी महाविकास आघाडीकडे श्रीगोंद्यात आज जरी मोठा नेता नसला तरी विधानसभा निवडणुकीत साजन पाचपुते यांनी जी भूमिका पार पाडून शेवटच्या टप्प्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र जसे बदलले होते त्यावरून साजन पाचपुते यांची या निवडणुकीतील भूमिका महत्वाची ठरणार आहे साजन पाचपुते आणी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे त्यामुळे पोटे यांना या निवडणुकीत घेरण्यासाठी साजन पाचपुते कोणते डावपेच टाकणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले हे काँग्रेस मधील वजनदार नेते आहेत त्यामुळे त्यांची या निवडणुकीतील भूमिका निर्णायक ठरणार आहे त्यांचे बंधू प्रशांत ओगले सध्या श्रीगोंद्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोट बांधताना दिसत आहेत तसेच निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुका विकास आघाडी स्थापन करून निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तिसरा प्यानेल उभा राहण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक तिरंगी होणार असे आजतरी वाटतं आहे
त्यातच मागच्या वेळेस २०१९ साली भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या सुनीता शिंदे यांचे पती एम डी शिंदे यांची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे २०१९साली त्यांच्या पत्नी सौं शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पासून दुरावले विधानसभा निवडणुकीत सुद्धा ते महाविकास आघाडीच्या गोटात सामील झाले होते साजन पाचपुते यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख असली तरी एम डी शिंदे सध्या भाजपचे उंबरठे झीझवताना दिसत आहेत त्यांनी पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवला आहे परंतु त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध होत असल्यामुळे शिंदे सध्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले कांतीलाल कोथिंबीरे हे सुद्धा यावेळी अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत
*जातीय समीकरण,आर्थिक निकष आणि जनसंपर्क ठरणार महत्वाचा*
असे असले तरी शेवटी उमेदवारीची माळ नेते कुणाच्या गळ्यात घालतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे आर्थिक सक्षमते सोबतच जन माणसात वेगळी छाप असणारा लोकांच्या संपर्कात राहणारा उमेदवार देण्याकडे नेत्यांचा कल राहणार आहे त्यातच जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवारी दिली जाणार आहे
त्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीचा माहोल पाहता ऐन थंडीतच राजकीय वातावरण तापणार हे मात्र निश्चित.
ईच्छुकांसाठी नगराध्यक्षपदाचा मार्ग "खुला"... तिरंगी लढतीची दाट शक्यता!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०७, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: