प्रशासक न्यूज,दि.७ऑक्टोबर२०२५
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे धाकटे चिरंजीव युवा नेते दिग्विजय राजेंद्र नागवडे यांच्या स्कोर्पिओ क्रं एम एच १२ युव्ही २५२५ या गाडीवर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी हल्ला करत गाडीची मोडतोड केली दिग्विजय यांच्या वाहनावर हल्लेखोरांनी हल्ला का केला याचे नेमके कारण समजले नसले तरी गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणातून हा हल्ला झाल्याचे समजते
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिग्विजय यांच्या आई सौ अनुराधा नागवडे या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी दिग्विजय यांनी रात्रंदिवस एक करत रान पेटवले होते त्यामुळे या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्याची किनार असण्याचा संशय देखील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे हल्लेखोरांनी दिग्विजय यांच्या स्कोर्पिओ गाडीला दोन वेळा कट मारला त्यानंतर ओव्हरटेक करत थेट त्यांनी रस्त्यात गाडी आडवी लावून दिग्विजय यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या पुढच्या मागच्या बाजूच्या काचा फोडल्या हा सर्व घटनाक्रम पाहता या हल्ल्यामागे काही राजकीय वैर असण्याची शक्यता नाकारता येत नाही
दि ५सप्टेंबर रोजी वाकड हायवेवर ब्रिजखाली रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फॉरच्यूनर क्रं एम एच १४ एच सी १८८१ या गाडीतून आलेल्या पाच ते सहा अनोळखी इसमांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड ने नागवडे यांच्या वाहनावर हल्ला केला या हल्ल्यात नागवडे यांच्या वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने दिग्विजय या हल्ल्यातून सुखरूप बचावले आहेत
दि ५सप्टेंबर रोजी रात्री हल्लेखोरांनी दिग्विजय नागवडे यांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करून पोलिसात आमची तक्रार केली तर तुला सोडणार नाही अशी धमकी देत गाडीची मागची व पुढची काच फोडत स्कोर्पिओ गाडीचे मोठे नुकसान केले आहे
सदर घटनेबाबत दि ६ रोजी दिग्विजय नागवडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
श्रीगोंद्यातील "युवा" नेत्याच्या वाहनावर हल्ला...हल्ल्याला राजकीय वैमनस्याची किनार? संशय व्यक्त!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०६, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: