प्रशासक न्यूज,दि.२ऑक्टोबर२०२५
श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसात घडणाऱ्या घटनानवरून श्रीगोंद्यात कायद्याचा धाकच उरला नसल्याचे चित्र असून श्रीगोंद्यात किरकोळ कारणावरून होणाऱ्या मारहानीच्या घटना आणि त्यातून पोलिसांचा धाक संपत चालल्याचेच दिसून येत आहे श्रीगोंद्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी आणि दादागिरी च्या घटनांनमुळे श्रीगोंद्याची वाटचाल सध्या बिहारच्या दिशेने सुरु असल्याचे चित्र दिसत आहे
रस्त्यावर बसलेल्या गायीला चारचाकी वाहनाचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादातून श्रीगोंदा शहराच्या माजी नगराध्यक्षा आणि नगरपरिषदेच्या गटनेत्या श्रीमती छायाताई गोरे यांचे चिरंजीव संतोष शांताराम गोरे वय ३९ यांना काल रात्री पाऊने बारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा बस स्थानक परिसरात लाकडी दांडक्याने आणि कमरेच्या बेल्टने पाच ते सहा जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तसेच मारहाण केल्यानंतर या टोळक्याने गोरे यांच्या खिशातील ६०हजार रुपये रोख रक्कम व त्यांच्या गळ्यातील ३तोळे वजनाची तीन लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन घेऊन हे आरोपी पळून गेले
सदर घटनेबाबत संतोष शांताराम गोरे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या रोहित अशोक कोथिंबीरे व त्याच्या सोबत असणारे पाच अनोळखी इसम यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे
काल दि १ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादी संतोष गोरे यांचा या आरोपीसोबत रस्त्यावर बसलेल्या गायीला चारचाकी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून किरकोळ वाद झाला होता त्याचा राग मनात धरून या आरोपीनी संतोष गोरे हे काल रात्री हॉटेल बंद करून घरी जात असताना त्यांना एकट्याला गाठत जबर मारहाण केली गोरे यांना मारहाण झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता
अगदी क्षुल्लक गोष्टीतून नगराध्यक्षाच्या मुलाला मारहाण होत असेल तर सामान्य जनतेचे काय होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत असून श्रीगोंद्यात कायद्याचा धाक निर्माण करण्याची माग णी होत आहे
माजी नगराध्यक्षांच्या मुलाला किरकोळ कारणातून जबर मारहाण....श्रीगोंद्याची वाटचाल बिहारच्या दिशेने?
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०१, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०१, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: