चौथऱ्याच्या बांधकामाचा वाद... जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ..श्रीगोंदा तालुक्यातील "या" नेत्यावर गुन्हा दाखल!


प्रशासक न्यूज,दि.२५सप्टेंबर२०२५

गावातील स्मशानभूमीत झेंड्याचे चौथऱ्याचे बांधकाम करण्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राज्यबाजार समितीचे सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब बन्सी नाहाटा यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार आज दि २५रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 
बाळासाहेब नाहाटा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात तसेच त्यांच्यावर राज्य बाजारसमितीच्या सभापती पदाची जबाबदारी आहे त्यातच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

लोणीव्यंकनाथ गावातील कमलाकर दादा आल्हाट यांच्या फिर्यादीवरून नाहाटा यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

फिर्यादित म्हंटल्या नुसार दि १८सप्टेंबर २०२५रोजी फिर्यादी आल्हाट हे दत्तात्रय सोनवणे,संभाजी जावळे,सुनील जावळे,अजय सोनवणे,अनिल नेटवटे व इतर काही लोक असे लोणीव्यंकनाथ 
गावातील बौद्ध आणि मातंग समाजाच्या जुन्या स्मशानभुमीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याचे चौथऱ्याचे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यासाठी जमले होते सदर गोष्टीबाबत गावच्या सरपंच सौ मनीषा नाहाटा यांना ग्रामपंचायती मार्फत माहिती देण्यात आली होती परंतु त्यांच्या वतीने त्यांचे पती बाळासाहेब नाहाटा हे गावचा कारभार पाहत असल्यामुळे ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फिर्यादी व दत्तात्रय सोनवणे यांना धक्काबुक्की करून दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले अशी फिर्याद नोंदवण्यात आली आहे 

सदर घटना दि.१८सप्टेंबर ला घडली असली तरी या घटनेबाबत फिर्यादी आल्हाट यांनी आज सायंकाळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यामुळे आज या बाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे
चौथऱ्याच्या बांधकामाचा वाद... जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ..श्रीगोंदा तालुक्यातील "या" नेत्यावर गुन्हा दाखल! चौथऱ्याच्या बांधकामाचा वाद... जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ..श्रीगोंदा तालुक्यातील "या" नेत्यावर गुन्हा दाखल! Reviewed by Prashasak on सप्टेंबर २५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.