प्रशासक न्यूज,दि.८जानेवारी२०२५
दौंड अहिल्यानगर रस्त्यावर आज दिवसभरात चिखली घाट आणि कोळगाव फाट्या नजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील आढळगाव येथील दोन व्यक्तींना या अपघातात आपला जीव गमवावा लागला त्यामुळे आजचा दिवस श्रीगोंदा तालुक्यासाठी अपघातवार ठरला आहे शहरातील सौ रंजनाबाई सुरेश पिपाडा(वय ६०)आणि आढळगाव येथील सुनील छत्तीसे अंदाजे वय(५०)अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत
अपघाता बाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी की आढळगाव येथील राहिवासी असणारे सुनील छत्तीसे हे आज पत्नी सह सायंकाळ च्या सुमारास दुचाकीवर नगर वरून श्रीगोंद्याकडे येत असताना चिखली घाटात समोरून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामुळे छत्तीसे हे रस्त्यावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते या अपघातात मयत झाले तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
तर दुसऱ्या अपघाता बाबत समजलेली माहिती अशी की शहरातील सुरेश पिपाडा त्यांच्या पत्नी आणि मुलासह आज सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सुनबाई यांना नगर येथे डिलेवरीसाठी १०२या सरकारी रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना कोळगाव च्या नजीक एक रिकामा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अचानक रस्त्यात आला त्यामुळे रुग्णवाहीका त्या ट्रॅक्टरला धडकली या अपघातात रंजना पिपाडा या गंभीर जखमी झाल्या तर त्यांचे कुटूंबीय या अपघातात जखमी झाले रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाला पिपाडा यांच्या सुनबाई यांची नगर येथे डिलिव्हरी झाली त्यात आई आणि बाळ सुखरूप बचावले परंतु रंजनाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
अश्या प्रकारे आज दिवसभरात दोन अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे
'अपघात' वार,दोघांचा मृत्यू,दोन गंभीर जखमी... श्रीगोंदा तालुक्यातील घटना!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी ०८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: