प्रशासक न्यूज,दि.६जानेवारी२०२५
श्रीगोंदा शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे शहर असून इथे हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने एकोप्याने राहत आहेत त्यामुळे ससाणेनगर मध्ये घडलेल्या किरकोळ वादाच्या घटनेला कुणी जातीय अथवा धार्मिक वळण देऊ नये अश्या प्रकारे या घटनेला धार्मिक वळण देऊन दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज विघातक लोकांचा निषेध नोंदवणारे आणि असा वाद पेटवणाऱ्या संघटनाना प्रशासनाने सक्त ताकीद द्यावी अशी मागणी करणारे निवेदन आज श्रीगोंद्यातील ससाणे नगर मधील सर्व समाज बांधवांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक व श्रोगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आले
दि.२ नोव्हेंबर २०२४ रोजी ससाणेनगर भागात दोन गटात किरकोळ वाद होऊन त्यानंतर दगडफेक झाली होती त्यानंतर ससाणेनगर येथील राम ससाणे हे मद्यधुंद अवस्थेत वादाबाबत माहिती घेण्यासाठी घरासमोर गेले होते त्यावेळी दगडाला पाय अडकल्यामुळे रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाली होती त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता याबाबत मयत ससाणे यांच्या पत्नीने श्रीगोंदा पोलीस स्टेशन व प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे
मयत राम शंकर ससाणे यांच्या मृत्यूचा आणि दोन गटातील वादाचा कोणताही संबंध नसताना सुद्धा काही समाज विघातक प्रवृतीच्या माध्यमातून अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यलयात चुकीच्या पद्धतीने निवेदन देत या घटनेला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे
श्रीगोंद्यात हिंदू मुस्लिम समाज गुण्या गोविंदाने राहत आहे त्यामुळे या घटनेला कुणी चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न केल्यास मातंग समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे
*अहिल्यानगर येथे आंदोलन आणि आरोपींवर वाढीव कलम*
श्रीगोंद्यातील या घटनेबाबत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना निवेदन देऊन हिंदू बांधवाच्या मृत्युंला कारणीभूत आरोपींवर कारवाईची मागणी केली होती त्यानंतर या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावून आज दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु हे प्रकरण मिटलेले असताना आज ही कारवाई झाल्यामुळे संतापलेल्या ससाणे नगर येथील नागरिक व मयत ससाणे यांच्या कुटुंबीयांनी श्रीगोंद्यात मोर्चा काढत निवेदन देऊन निषेध नोंदवला
खबरदार...'त्या' घटनेला धार्मिक वळण देऊ नका,अन्यथा...!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी ०६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: