प्रशासक न्यूज,दि.५जानेवारी२०२४
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ या चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता २८०० रुपये प्र. मे. टनाप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसात सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही. सातत्याने चांगला ऊस भाव देऊन सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. सभासद शेतकऱ्यांना मागील २०२३-२४ मध्ये दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षीची एफ.आर. पी. सह २९००रु प्र.मे. टन याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
त्यानुसार चालू २०२४-२५ या गळीत हंगामास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता रुपये २८००रु प्र. मे. टनाप्रमाणे देण्यात येणार आहे. नागवडे कारखान्याने सातत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर व इतर पूर्तता केलेली असून सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत नागवडे कारखाना ऊस भावात मागे राहणार नाही असे नागवडे म्हणाले.
तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ऊस भावा बाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्य यांनी केले आहे.
...पहिला हप्ता दोन दिवसात जमा करणार,अध्यक्षांची माहिती!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी ०५, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: