प्रशासक न्यूज,दि.२३सप्टेंबर२०२५
श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे या पाऊसाने तालुक्याला झोडपून काढले आहे आज दि २३ सप्टेंबर पर्यत तालुक्यात एकूण २२१ मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला असून आतापर्यत सरासरीच्या १३८% एवढा धो धो पाऊस तालुक्यात बरसला आहे एकूण पाऊसाच्या ३८%अधिक पाऊस आतापर्यत झाला आहे यात कोळगाव मंडलात सर्वाधिक २९९.५मिलिमिटर(१८७%)आणि त्या खालोखाल मांडवगण मंडलात २६५.९मिलिमिटर(१६६%) एवढा पाऊस झाला आहे
श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार दि २२ सप्टेंबर पर्यत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने ७७हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले असून १३०शेतकऱ्यांचे यात प्रचंड नुकसान झाले आहे रात्री झालेल्या पाऊसामुळे सोयाबीन,मका,कांदा,कापूस,उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टीग्रस्त शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ होणार आहे मंडल अधिकाऱ्यांकडून आज नुकसानीचे पंचनामे सुरु होते त्यामुळे या आकड्यात वाढ होणार आहे
श्रीगोंदा तालुक्यात मंडल निहाय झालेला पाऊस मिलिमिटर मध्ये

श्रीगोंदा २१५.८मीमी(१३४. ७%)
काष्टी.. १७०मिमी(१०६. १%)
मांडवगण.. २६५.९मिमी (१६६%)
बेलवंडी... २०३. ७मिमी (१२७. २%)
पेडगाव.. २०५. ७मिमी(१२८. ४%)
चिंभळा.. १९४. ९मिमी(१२१. ७%)
देवदैठण... २३७. ५मिमी(१४८. ३%)
कोळगाव.. २९९. ५मिमी(१८७%)
लोणीव्यंकनाथ..१९८. ६मिमी(१२४%)
भाणगाव.. २०१. ३मिमी(१२५. ७%)
आढळगाव.. २३७. ८मिमी(१४८. ४%)
तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार निबंवी पिंपळगाव पिसा या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही काळ या भागाचा संपर्क तुटला होता परंतु पूर ओसरल्यानंतर पुन्हा या भागातील वाहतूक सुरळीत झाली श्रीगोंदा नगर रस्त्यावर पारगाव आणि मखरेवाडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती मोठ्या वाहनाची येजा सुरु होती दुचाकी वाहनांची वाहतूक मात्र पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाली होती
शेडगाव येथील म्हस्के वस्ती ते गावठाण यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल जोरदार झालेल्या पाऊसाच्या पाण्यामुळे वाहून गेला त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह या भागतील लोकांना येण्या जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे जोरदार झालेल्या पाऊसामुळे हिरडगाव च्या पुढे असलेल्या लोहकरा ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे श्रीगोंदा ते कर्जत रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती
श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे नुकसान झाले आहे तसेच अनेक व्यापारी वर्गाचे देखील या पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले आहे
*श्रीगोंद्यातील एस के एंटरप्राइजेस सिमेंट आणि पाईप कारखान्याचे मोठे नुकसान*
दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे आलेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने श्रीगोंदा लिंपणगाव परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच होलेवाडी परिसरातील एस के एंटरप्रायजेस सिमेंट पाईप कंपनी येथे झाडे उन्मळून मोल्ड आणि मशिनरीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सदर उद्योगासाठी कंपनीचे मालक सुदाम कोथिंबीरे यांनी नुकतेच मोठे कर्ज घेऊन उभारलेले बांधकाम आणि मशिनरी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह वापऱ्यांना मदत मिळण्याची मागणी होत आहे

परतीच्या पाऊसाने तालुक्याला झोडपले...शेतकऱ्यांचे नुकसान...या भागात सर्वाधिक पाऊस!!
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २३, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २३, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: