त्र्यंबकेश्वर येथील घटनेचा श्रीगोंद्यात निषेध!


प्रशासक न्यूज,दि.२३सप्टेंबर२०२५

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या डिजिटल माध्यमातील पत्रकारांवर समाजकंटकांनी हल्ला करत त्यांना केलेल्या जबर मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,श्रीगोंदा तालुका यांच्या वतीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला नुकतेच निवेदन देण्यात आले यावेळी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी सर्व पत्रकारांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली

निवेदन सादर करताना श्रीगोंदा प्रेस क्लबचे अध्यक्ष विशाल चव्हाण,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे,माजी अध्यक्ष अंकुश शिंदे, पत्रकार आप्पासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल झेंडे, मुख्य सचिव मेजर भिमराव उल्हारे, डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर मचे, शहराध्यक्ष नितीन रोही,वैभव हराळ व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे,अभिजीत सोनवणे आणि किरण ताजने हे आपल्या कर्तव्य बजावत एका घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेले असताना पार्किंगच्या किरकोळ कारणातून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही पत्रकार गंभीर जखमी झाले असून, सध्या ते उपचार घेत आहेत

पत्रकारांवर झालेला हा हल्ला म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या चौथ्या स्तंभावर म्हणजेच माध्यमस्वातंत्र्यावर झालेला गंभीर आघात असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले. वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांचा गळा घोटण्याचा हा आघोरी प्रकार असून, शासनाने याची तातडीने दखल घेऊन हल्लेखोर नराधमांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली.पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणीही करण्यात आली.




त्र्यंबकेश्वर येथील घटनेचा श्रीगोंद्यात निषेध! त्र्यंबकेश्वर येथील घटनेचा श्रीगोंद्यात निषेध! Reviewed by Prashasak on सप्टेंबर २३, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.