प्रशासक न्यूज,दि.२३सप्टेंबर२०२५
श्रीगोंदा : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनने आयोजीत केलेल्या ७० व्या वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो २०२५ मध्ये
उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार” ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रे पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. हा सन्मान ओमराजे बाबूराव बोत्रे पाटील यांनी स्वीकारला.
सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक डॉ. सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ
वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, एस टी आय ए चे अध्यक्ष संजय अवस्थी एस आय एस एस टी ए चे अध्यक्ष एन.चिन्नप्पन उपस्थित होते.
"ओंकार" ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २३, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २३, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: