भीषण अग्नितांडव दहा ते बारा दुकानें जळून खाक...श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना


प्रशासक न्यूज,दि.२३सप्टेंबर२०२५

काल दि २२रोजी श्रीगोंदा शहरातील संकल्प एस मार्ट मॉल ला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज दि २३ मंगळवार रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे भीषण आग लागून जवळपास १०ते १२दुकानें जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली आहे या आगीत व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे

काष्टी गावातील श्रीगोंदा चौक ते नगर रस्त्यावर असलेली बेकरी,वडापाव,भेळ, डेअरी प्रोडक्ट चे दुकान,पान टपरी अशी विविध दुकानें या अग्नीतांडवात जळून भस्मसात झाली आहेत

आग नेमकी कश्यामुळे लागली याबाबत नेमके कारणं समजू शकले नाही आग लागल्यानंतर जागरूक नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे नाईलाज झाला

आग लागली तेव्हा यातील एका बेकरी मध्ये गॅस सिलेंडर च्या तीन गॅस टाकी होत्या लोकांनी तत्परता दाखवत यातील दोन गॅस टाक्या बेकरीतून बाहेर काढल्या परंतु एका गॅस टाकीचा स्फ़ोट झाला त्यात एक जण किरकोळ जखमी झाला असून गॅस टाकीच्या स्फ़ोटामुळे आगीचा भडका उडाला आगीने उग्र रूप धारण करत आजूबाजूचे दहा ते बारा दुकानें या आगीने गिळणकृत केली

या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे

सदर घटनास्थळी पोलीस किंवा अग्निशमन दल कुणीही पोहचले नसल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले

भीषण अग्नितांडव दहा ते बारा दुकानें जळून खाक...श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना भीषण अग्नितांडव दहा ते बारा दुकानें जळून खाक...श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना Reviewed by Prashasak on सप्टेंबर २२, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.