प्रशासक न्यूज,दि.१६सप्टेंबर२०२५
श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून सुरु झालेले चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे नाहीत आज मध्यरात्री च्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बगाडे कॉर्नर येथील दोन किराणा मालाची दुकानें चोरट्यानी फोडली यात एका दुकानातील पाच हजार रु रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समजली असून दुसऱ्या दुकानातून किती मुद्देमाल चोरीला गेला याबाबत माहिती समजली नाही
या चोरीबाबत दुपारी उशिरा पर्यत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी कुणीही तक्रारदार आले नव्हते
परंतु अश्या प्रकारे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी हे चोऱ्यांचे सत्र थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी श्रीगोंदेकर जनता करत आहे.
पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर चोरी.. चोऱ्यांचे सत्र थांबणार कधी?
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १६, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: