प्रशासक न्यूज,दि.१६सप्टेंबर२०२५
एसटी बस चे पाणी कार वर उडाल्याच्या रागातून झालेल्या वादात एसटी वाहकाला लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची घटना १५सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील समर्थ लॉन्ससमोर घडली आहे
या घटनेबाबत एसटी वाहक संतोष बाळासाहेब थोपटे वय.३६ रा मोराची चिंचोली ता शिरूर यांच्या फिर्यादीवरून सागर ससाणे याच्यासह एका अनोळखी इसमा विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
काल दि १५सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस क्र एम एच१४ डिटी ४१४३ या बसमधून वाहक थोपटे हे चालक गाडिलकर यांच्यासह विसापूर वरून शिरूरकडे जात असताना देवदैठण शिवारात एसटी बस जवळून जाणाऱ्या इको कार क्र एम एच १६ डीजे ९१४५ या कारवर एसटी चे पाणी उडाल्यामुळे कार चालकाने एसटी चालक गाडिलकर यांना शिवीगाळ करत पुढ या तुमच्याकडे बघतो असा दम दीला त्यानंतर त्याने फोन करून त्याच्या साथीदाराला बोलावून घेतले बस समर्थ लॉन्स समोर आली असता कार चालकाने एसटी ला कार आडवी लावली त्याचवेळी एका दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने बस मध्ये चढून वाहक संतोष थोपटें यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यानी मारहाण केली तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनला जाऊन माझं नाव सागर ससाने आहे असं सांग असं म्हणत वाहकाला च दम भरला त्यानंतर एसटी वाहक थोपटें यांच्या फिर्यादीवरून सागर ससाने आणि कार वरील अज्ञात व्यक्ती विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे
*पोलिसांना जाऊन माझं नाव सांग,आरोपीची मुजोरी,व्हिडीओ व्हायरल*
एसटी वाहकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुण यात मारहाण करणाऱ्या व्यक्तीने एसटी वाहकाला मारहाण केल्यावर बेलवंडी पोलिसांना जाऊन माझं नाव सांग असे सांगत बेलवंडी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला फोन लावून तुम्ही माझ्यावर कारवाई करणार का असा उलट सवाल केला आहे त्यामुळे आता फोन लावलेला पोलीस कोण असा सवाल उपस्थित झाला असून मारहाण करणाराच पोलिसांना माझ्यावर कारवाई करणार का असा प्रश्न विचारत असल्यामुळे पोलिसांचा धाक संपल्याचे दिसून येत आहे तसेच अश्या प्रकारे मारहाण करून पोलिसांना फोन लावला जात असेल तर अन्याय झालेल्या सामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल उपस्थित होत आहे
पाणी उडाल्याचा राग वाहकाला मारहाण!मारहाण करणाऱ्याचाच पोलिस कर्मचाऱ्याला फोन.. कायद्याचा धाक संपलाय!
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १६, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: