बंदूकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याचे अपहरण... ३०लाखांची खंडणी वसूल,संचालकासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल!


प्रशासक न्यूज,दि.१३सप्टेंबर२०२५


राहता तालुक्यातील निघोज येथील राहिवासी असणारे व्यापारी प्रशांत देविदास मते यांना पिस्टलचा धाक दाखवत त्यांच्याकडून ३०लाख ३० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कृषीउत्पन्न बाजारसमिती येथे दि ३सप्टेंबर२०२५ रोजी दुपारी पावणे एक ते रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून काल मते यांच्या फिर्यादीनुसार श्रीगोंदा कृषीउत्पन्न बाजारसमितीचे संचालक बाबासाहेब भाऊसाहेब जगताप श्रीगोंदा,अजय शेळके,शुभम रामचंद्र महाडिक यांच्यासह इतर अनोळखी ७ते ८ जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काल रात्री उशीरा विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

व्यापारी प्रशांत मते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३सप्टेंबर रोजी मते हे त्यांचा मित्र चांगदेव पवार यांच्या सोबत श्रीगोंदा कृषीउत्पन्न बाजारसमिती येथे आले होते त्यावेळी बाबासाहेब जगताप, अजय शेळके,शुभम महाडिक यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांच्या क्रीस्टा इनोव्हा गाडी क्र एम एच१६ डीएम९५९६ या गाडीत जबरस्तीने अपहरण करून फिर्यादी प्रशांत मते यांना पिस्टल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत २.५कोटी रुपयांची मागणी केली त्यानंतर आरोपीनी ३०लाख३०हजार रुपयांची खंडणी फिर्यादी मते यांच्याकडून घेतली खंडणी स्वरूपात पैसे स्विकारल्यानंतर आरोपीनी मते यांना सोडून दिले पण त्यानंतर उर्वरित पैश्यांसाठी वारंवार व्हाट्सअप वर फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली

अश्या प्रकारे खंडणी साठी व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला पिस्तूलचा धाक दाखवत लुटल्या च्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे

*खंडणीखोर बाजारसमितीचा संचालक तर एक कर्मचाऱ्याचा मुलगा*

व्यापारी मते यांना खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपीन मध्ये चक्क बाजारसमितीचा विद्यमान संचालक बाबासाहेब जगताप आणि बाजारसमितीच्या एका कर्मचाऱ्याच्या मुलाचा समावेश असल्यामुळे सर्वत्र या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे


दिवसेंदिवस श्रीगोंद्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून श्रीगोंद्यात नेमक काय चाललय असा सवाल आता उपस्थित होत आहे 
बंदूकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याचे अपहरण... ३०लाखांची खंडणी वसूल,संचालकासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल! बंदूकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याचे अपहरण... ३०लाखांची खंडणी वसूल,संचालकासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल! Reviewed by Prashasak on सप्टेंबर १३, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.