श्रीगोंद्यात अपघात.. तिघेजण जखमी एक गंभीर!


प्रशासक न्यूज,दि.१२सप्टेंबर२०२५

श्रीगोंदा शहरातील काष्टी रस्त्यावर सिद्धेश्वर चौकानजीक दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून त्यात एक महाविद्यालयीन तरुण आणि पती पत्नी असे तिघेजण जखमी झाले आहेत यातील पती पत्नी अजनूज येथील तर तरुण हा कोळगाव येथील राहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी पैकी पती गंभीर जखमी असून त्यांच्यावर श्रीगोंदा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत सदर घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली

अपघात कसा घडला याबाबत नेमकी माहिती समजली नसली तरी एक दुचाकी चुकीच्या दिशेने जात असताना त्याला दुसरी दुचाकी येऊन धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे परिसरातील व्यवसायिकानी सांगितले मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंद्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवर तीन महाविद्यालयीन तरुण होते तर अजनूज येथील पती पत्नी एका दुचाकीवर चालले होते या दोन्ही दुचाकी एकमेकांना जोरात धडकल्या त्यामुळे हा अपघात झाला अपघाता नंतर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती

अपघात झाल्यावर काही सुज्ञ् नागरिकांनी अपघातग्रस्ताना उपचारासाठी दवाखान्यात नेले या अपघाता नंतर सदर ठिकाणी जे दुभाजक तोडण्यात आलेले आहेत त्यामुळे एका बाजूची वाहने दुसऱ्या बाजूला अचानक घुसल्यामुळेच हे अपघात होत असून हे दुभाजक बंद करण्याची मागणी काही व्यवसायिकानी केली आहे
श्रीगोंद्यात अपघात.. तिघेजण जखमी एक गंभीर! श्रीगोंद्यात अपघात.. तिघेजण जखमी एक गंभीर! Reviewed by Prashasak on सप्टेंबर १२, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.