प्रशासक न्यूज,दि.९सप्टेंबर२०२५
शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून शासकीय वसाहती बांधल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत या शासकीय वसाहतींमध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी वास्तव्यास होते परंतु श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच शासकीय वसाहतींची सध्या प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे या वसाहतीत कोणीही राहत नाही त्याचाच गैरफायदा घेत दारू पिणारे वेगवेगळी नशा करणाऱ्या लोकांनी या शासकीय वसाहती वर कब्जा करत त्या वसाहती आपल्या नशेचे ठिकाण बनवल्या आहेत
एवढेच नाहीतर या वसाहतीत अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या,कंडोम ची पाकिटे पडल्याचे दिसून येत असल्यामुळे रंगरलिया करणाऱ्या लोकांसाठी या वसाहती हक्काचे ठिकाण बनले आहे वसाहतींचे मोठी दुरावस्था झाल्यामुळे दिवसा देखील या वसाहतींकडे कोणी फिरकत नाही त्यामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि व्यसनी लोकांसाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वसाहती या अय्याशी करण्याचा अड्डा बनल्या आहेत
श्रीगोंदा शहरातील कुकडी वसाहत,पोलीस वसाहत,पंचायत समिती वसाहत या शासकीय वसाहतींची प्रचंड मोठी दुरावस्था झाली असून त्या अखेरची घटका मोजत आहेत वडाळी रस्त्यावर असलेल्या पंचायत समितीच्या शासकीय वसाहतीत काही वर्ष्यांपूर्वी पंचायत समिती सभापतींसह अनेक अधिकारी कर्मचारी वास्तव्यास होते परंतु दिवसेंदिवस या वसाहतीची मोठी दुरावस्था झाली आहे या वसाहतीमधील खोल्यांचे दरवाजे तुटले आहेत खोल्यांची पडझड झाली आहे वसाहतीची संरक्षक भिंत एका ठिकाणी पडली आहे या पडझडीमुळे याठिकाणी अनेक वर्ष्यापासून कुणीही वास्तव्यास नाही त्यामुळे याचाच गैरफायदा घेत अनेक प्रेमी युगुल,युवक युवती यांच्या रासलीला याठिकाणी रंगत असल्याचे चित्र या वसाहतीत अनेक ठिकाणी आढळून येणाऱ्या कंडोमच्या पाकिटानवरून दिसून येत आहे
श्रीगोंदा शहरातील पोलीस वसाहत तर तिच्या झालेल्या प्रचंड दुरावस्थेमूळे इतिहास जमा होण्याच्या मार्गांवर आहे पेडगाव रस्त्यावरील कुकडी वसाहतीची तशीच अवस्था असून या ठिकाणी देखील रात्रीच्या वेळी नशा करणाऱ्या तरुणांची मोठी रेलचेल असल्याचे पाहायला मिळते
शहरासह तालुक्यातील आढळगाव, औटेवाडी,पारगाव,विसापूर या गावांसह अनेक ठिकाणी कुकडी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची मोठी दुर्दशा झाली आहे त्यामुळे प्रशासनाने या दुरावस्थेकडे लक्ष देत या वसाहतींचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणे जरुरी आहे या वसहतींची डागडुजी केल्यास अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा राहण्याचा प्रश्न मिटणार आहे वसाहती मोडकळीस आल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम खर्च करून भाड्याने खासगी खोल्या घेऊन राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने यामध्ये लक्ष घालणे जरुरी आहे
*शासकीय वसाहतीत खुलेआम सुरु होता वेश्याव्यवसाय*
शहरातील एका नावाजलेल्या शासकीय वसाहती मध्ये मागील काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या वेश्या व्यवसाय सुरु होता काही जागरूक तरुणांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पण पोलीस कारवाईला येण्या आधीच त्याची कुणकुण लागल्यामुळे संबंधीत महिला तिथून निघून गेल्या
परंतु शासकीय वसाहतीचा अशा प्रकारे गैरवापर होणं चुकीचं असून शासकीय वसाहतीवर कुणाचे नियंत्रण आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे
*शासकीय वसाहतींचा पुनर्विकास होणे गरजेचे*
श्रीगोंदा तालुक्यातील मोडकळीस आलेल्या शासकीय वसाहतींचा पुनर्विकास करून त्या करार पद्धतीने किंवा भाडे तत्वावर दिल्यास त्याचा अनेक लोकांना फायदा होऊन शासनाला महसूल मिळणार आहे
आय्याशांचा अड्डा की....?प्रशासनाचे दुर्लक्ष!
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०८, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: