प्रशासक न्यूज,दि.३०ऑगस्ट २०२५
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अशी राज्यभरात ख्याती असलेले श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर सध्या यात्रा कमिटी आणि दर्गाह ट्रस्ट यांच्या वादात अडकले असून त्यामुळे या मंदिराच्या निर्माणाचे काम अनेक वर्ष्यापासून रखडले आहे काल थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच या वादाचा अनुभव आला त्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले असता चादर चढवण्यावरून त्यांच्यासमोरच यात्रा कमिटी आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यातील वादाचे ओंगाळवाने प्रदर्शन पाहायला मिळाले उपमुख्यमंत्र्यांनी अर्पण केलेली चादर भोजराज मोटे यांनी तात्काळ काढून घेतली त्यावर अजित पवार चांगलेच संतापले यावरून त्यांनी आपल्या भाषणात देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आधी इथं एकोपा निर्माण करा नंतर मंदिर प्रश्नात मदत करतो असा सूचना वजा इशाराच त्यांनी नेत्यांना दीला सभेनंतर दर्गाह ट्रस्ट चे अध्यक्ष आमीन शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घडलेल्या प्रकाराबाबत प्रसार माध्यमांना माहिती देत घनश्याम शेलार यांचे समर्थक भोजराज मोटे यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले तसेच माझ्यासमोर असा प्रकार होत असेल तर माझ्यामागे काय होत असेल असे खडे बोल अजित दादांनी उपस्थितांना सुनावल्याचे शेख यांनी सांगितले
त्यानंतर आज यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटील यांनी या प्रकाराबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देताना आमीन शेख यांनी चुकीची माहिती देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे तसेच काल अजित पवार हे दर्शनासाठी मंदिरात आले असता गावकरी आणि यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने शेख महंमद महाराज यांच्या विचाराला अभिप्रेत चादर अर्पण करत असतानाच आमीन शेख यांनी महाराज्यांच्या विचारांना अभिप्रेत नसणारी चादर अर्पण करण्याचा प्रयत्न केला या चादरीला ना.पवार यांचा हात लागलेला नसतानाच भोजराज मोटे यांनी ती चादर सन्मानपूर्वक उचलली त्यानंतर यात्रा कमिटीच्या वतीने चादर चढवत असतानाच दादा तुमच्यासमोर असे घडतं असेल तर मागे काय होत असेल असे आमीन शेख म्हणाले हे त्यांच्या तोंडातील वाक्य अजित पवार म्हणाले असा त्यांनी विपर्यास करत ना. पवार यांनी ते वाक्य वापरल्याचे सांगत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप देखील गोपाळ मोटे पाटील यांनी केला आहे
दररोज मंदिरात शेरा चढवणे आणि गुरुवारी अन्नदान करण्याचे काम नियमितपणे शेरा समिती करत असून याच्याशी शेख कुटुंबाचा कुठलाही संबंध नाही उलट आमीन शेख हेच २५ वर्ष्यानंतर काल मंदिराच्या गाभाऱ्यात आल्याचा आरोप सुद्धा मोटे यांनी केला आहे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी उभ राहणं आवश्यक होत त्याठिकाणी आजीज शेख आणि त्यांचे नातेवाईक उभे होते त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना पश्चिम दिशेला उभे राहून दर्शन घ्यावे लागले हा अवमान शेख परिवाराने केल्याचा आरोप यात्रा कमिटी ने केला आहे
दोन्ही बाजूकडून आपआपली बाजू सावरण्याचा प्रयत्न होत असला तरी उपमुख्यमंत्र्यांन पुढे अश्या प्रकारे वादाचे प्रदर्शन होणे चुकीचे असल्याचे मत नागरिकांन मधून व्यक्त होत आहे
उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच वादाचे प्र "दर्शन"...दादांचा संताप,दोन्ही बाजूने आरोप!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२५
Rating:
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: