प्रशासक न्यूज,दि.३०ऑगस्ट २०२५
राज्यता भाजप,शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) या तीन पक्षांचा सहभाग असणाऱ्या महायुतीचे सरकार आहे श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पाचपुते विरोधक मागील काही दिवसात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकवटले गेल्यामुळे श्रीगोंद्यात मात्र या महायुतीला तडा जाणार हे ठरलेले होते पाचपुते विरोधक राष्ट्रवादीत एकत्र आल्यामुळे श्रीगोंद्यात महायुती भंग पावून ती पाचपुते विरुद्ध सर्व पाचपुते विरोधक नेते अशीच राहणार हे सर्वश्रुत होते मात्र काल श्रीगोंद्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेल्यानंतर महायुतीमध्ये धुसफुसणारा वाद आता मात्र उफाळून चव्हाट्यावर आला आहे
काल उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगोंद्यात सभेसाठी आले होते सभेला येण्याआधी त्यांनी राजेंद्र नागवडे यांच्या सोबत जाऊन ढोकराई-वांगदरी-इनामगांव या रस्त्याचे उदघाट्न केले त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे
राज्यात महायुतीचे सरकार आहे याच महायुतीचा महत्वाचा आणि मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपचे विक्रमसिंह पाचपुते हे श्रीगोंद्याचे आमदार आहेत असे असताना सुद्धा काल झालेल्या रस्त्याच्या उदघाट्न प्रसंगी त्यांना कुठलीही कल्पना देण्यात आली नाही किंवा या उदघाट्नाचे साधे निमंत्रण सुद्धा देण्यात आले नाही त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत सदर रस्त्यासाठी माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री आणि त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून २०२३-२४ मध्ये विशेष रस्ता दुरुस्ती निधी मधून रस्ता मंजूर करून घेतला होता त्याबाबतची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत असे सांगतानाच राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार यांची दिशाभूल करत काल सरकारी कार्यक्रम नसताना कुठलाही प्रोटोकॉल नसताना विद्यमान आमदारांना निमंत्रण न देता स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अपूर्ण रस्त्याचे उदघाट्न करण्याचा जाणीवपूर्वक घाट घातल्याचा आरोप संदीप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे
तसेच अजित पवार हे महायुतीचे घटक असताना सुद्धा स्थानिक आमदारांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता अश्या प्रकारे अपूर्ण रस्त्याचे उदघाट्न झाले त्याचा देखील संदीप नागवडे यांनी जाहीर निषेध नोंदवला असून याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे तसेच आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याची विनंती त्यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
श्रीगोंद्यात "महायुती" मधील वाद चव्हाट्यावर...थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: