प्रशासक न्यूज,दि.३०ऑगस्ट२०२५
पुणे येथे नुकताच अवयवदाना बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या लोकांचा ब्लिंकफेअर अवार्ड नाईट २०२५ मोठया उत्साहात पार पडला
यात ४० हून अधिक मॉडेल्स कलाकार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात दौंड येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रेमकुमार भट्टड यांची कन्या डॉ.चैत्राली भट्टड यांना "बेस्ट चार्मिंग फेस अवार्ड "पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.चैत्राली यांनी यावेळी सांगितले की डॉक्टर म्हणून कार्य करत असताना आपल्या माॅडेलिंगची आवड सुध्दा यशस्वीरित्या जपली आहे.हे यश फक्त केवळ सौंदर्य आणि स्टाईल पुरते मर्यादित नसून डॉक्टर म्हणून असलेल्या आणि कर्तव्याबरोबर आवडी निवडीला योग्य व्यासपीठ देण्याचा सुंदर योग आहे असेही डॉ. भट्टड यांनी सांगितले.
डॉ.चैत्राली भट्टड यांनी याअगोदर अनेक राज्यस्तरीय माॅडेल पुरस्कार विजेती ठरल्या आहेत.
यावेळी ब्लिंक ऑनलाईन मॉडेलिंग एजन्सीच्या संस्थापिका तथा आयोजक प्रज्ञा शिंदे, आंतरराष्ट्रीय मॉडेल दिशा शामवानी दिग्दर्शक राहुल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.चैत्राली भट्टड यांना "बेस्ट चार्मीग फेस अवार्ड" प्रदान
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: