....असलं वागण बर नव्ह...श्रीगोंद्यात अजित दादांचे नेत्यांना खडेबोल सुनावत कानपिचक्या,तर नेत्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या!
प्रशासक न्यूज,दि.२९ऑगस्ट२०२५
विशाल अ चव्हाण
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या खास वक्तृत्व शैलीमुळे सर्वांना परिचित आहेत त्याचाच आज प्रत्यय श्रीगोंदेकरांना पहायला मिळाला बोगद्याचा प्रश्न, शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रश्न, आर्थिक फसवणूक प्रकरण,कारखान्याची आर्थिक अडचण या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करतांना त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत एकवटलेल्या प्रमुख नेत्यांनी आज श्रीगोंद्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यावर सकाळ पासूनच पाऊसाचे सावट होते पण सभेच्या वेळी पाऊसाने उघडीप दिली
आज झालेल्या या सभेत अजित पवार यांनी श्रीगोंद्यातील नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या घेत एकत्र राहण्याचा सल्ला दीला कुकडीच्या पाणी प्रश्नावर बोलताना ज्या भागात धरण आहेत त्या लोकांचा आणि तुमच्या भागातील लोकांमध्ये मतभेद आहेत पण त्यावर मार्ग काढू असे सांगतानाच डिंभे माणिक डोह बोगद्याच्या मागणीवर मात्र त्यांनी नेत्यांना खडे बोल सुनावत तुम्हाला मागणी करणं सोपं आहे पण ज्यांच्या जमींनी धरणात गेल्या त्यांचा विचार करावा लागतो नुसतं मागणी करून भोक पाडा आणि बोगदा काढा म्हणण्या एवढं ते सोप्प नाही असं म्हणत बोगदा प्रश्नावर पवार यांनी सध्या तरी असमर्थता दर्शवली तसेच सिसपे प्रश्नावर बोला असे सांगितल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर देत सिसपे ला पैसे कुणी दिले मी पैसे द्यायला सांगितले होते का तुम्ही काहीही करणार आणि मंग म्हणणार दादा आम्हाला वाचवा आम्ही काय मक्ता घेतलाय का असे ठणकावून सांगतानाच ज्या कंपण्यांना मान्यता नाही त्यात तुम्ही गुंतवणूक कशी करता असे सांगतानाच हातवारे करत जास्त व्याज देणारे तुम्हाला घोडा लावणार असे ग्रामीणशैलीत लोकांना सुनावले त्यावर एकच हश्या पिकला तसेच अश्या आर्थिक फसवणूकीबाबत लवकरच कायदा आणणार असल्याचे पवार यांनी सांगितले
*तर मात्र चौकशी लावावी लागेल*
सध्या सहकारी आणि खासगी कारखानदारी यांच्यात प्रचंड स्पर्धा आहे सहकारी कारखान्यांना मदत करण्याची भूमिका आहे कुकडी कारखान्याला आर्थिक मदत करू असे सांगतानाच कारखान्याला एनसीडिसिचे कर्ज देताना कर्ज फिटले नाही तर संचालकांचे मॉर्गेज करून द्या असे मी त्यांना बांधून घेतल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने योग्य पद्धतीने चालवणे ही संचालक मंडळाची जबाबदारी आहे अडचणीतल्या कारखान्याला नक्की मदत करू पण ऊस भरपूर आहे सगळं व्यवस्थित आहे तरी असे असताना मंग कारखान्याची अडचण होतेच कशी याची मात्र चौकशी लावावी लागेल असा एकप्रकारे सज्जड दम अजित दादांनी यावेळी दीला
सध्या सहकारी आणि खासगी कारखानदारी यांच्यात प्रचंड स्पर्धा आहे सहकारी कारखान्यांना मदत करण्याची भूमिका आहे कुकडी कारखान्याला आर्थिक मदत करू असे सांगतानाच कारखान्याला एनसीडिसिचे कर्ज देताना कर्ज फिटले नाही तर संचालकांचे मॉर्गेज करून द्या असे मी त्यांना बांधून घेतल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने योग्य पद्धतीने चालवणे ही संचालक मंडळाची जबाबदारी आहे अडचणीतल्या कारखान्याला नक्की मदत करू पण ऊस भरपूर आहे सगळं व्यवस्थित आहे तरी असे असताना मंग कारखान्याची अडचण होतेच कशी याची मात्र चौकशी लावावी लागेल असा एकप्रकारे सज्जड दम अजित दादांनी यावेळी दीला
*तर मंग तुमच्या इथलं कुणी मिटवायचं*
तुम्ही सर्वजण एकत्र आलात तर एकजीवाने काम करा तुम्ही विरोधात उभे राहिल्यामुळे त्याचा फायदा पाचपुते यांच्या चिरंजीवाला झाला मी तिकडं काम करतोय पण इथं तुमच्यात मतभेद झाले तर मंग ते कुणी मिटवायचे असा मिश्किल टोला सर्व नेत्यांना अजित दादांनी लगावला
*इंनस्पेक्टरला आत घ्यायला सांगतो, असलं वागण बर नव्ह दादांचा संताप*
सभेला सुरुवात करण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंद्याचे ग्रामदैवत शेख महंमद महाराज यांच्या मंदिरात जाऊन चादर अर्पण केली त्यावेळी ही चादर त्यांनी दिलेली आहे असे सांगत एका अतिउत्साही कार्यकर्त्याने पवार यांनी चढवलेली चादर काढून घेतली त्याचा भाषणात खरपूस शब्दात अजित पवारांनी समाचार घेत या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला हे असलं वागण बर नव्ह म्हणत बारामतीला कुणी माझ्यापुढं आवाज करत नाही आणि इथं काय चाललंय हे असं म्हणत इंस्पेक्टरला सांगतो मग आत घ्यायला असे म्हणत आधी इथं त्यांच्यात एकोपा निर्माण करा मंग मंदिर प्रश्नात मदत करतो असे खडे बोल पवारांनी नेत्यांना सुनावले
*योग्यवेळी कर्जमाफी करू, कर्जमाफीच्या मुद्द्यापासून लांब गेलेलो नाही*
कर्जमाफीच्या मुद्द्यापासून आपण लांब गेलेलो नाही योग्यवेळी कर्जमाफी करू असे सांगतानाच याआधी दोनवेळा कर्जमाफी केल्याचे त्यांनी सांगत व्याज नाही पण मुद्दल तरी वेळेवर भरा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले दोनवेळा तसेच एआय तंत्रज्ञानाचा शेतीसाठी चांगला फायदा होत असून त्यासाठी ५००कोटींची तरतूद केल्याचे सांगतानाच लाडक्या बहीण योजनेवर वर्ष्याला ४५लाख कोटी रुपयांचा खर्च होत असून शेतकऱ्यांच्या शेतीची वि्जमाफी केली त्यावर वर्षाकाठी २०हजार रु कोटी सरकार महावितरण ला खर्च करत आहे तसेच सरकार शेतकऱ्यांना ३लाखांपर्यत शून्य टक्के व्याजदराने पिककर्ज देत असल्याचे पवार यांनी सांगितले निमगाव खलू येथे होऊ घातलेल्या सिमेंट प्रकल्पा बाबत बोलताना नागरिकांना त्रास होणार असेल तर या प्रकल्पाबाबत विचार करावा लागेल असेही पवार यांनी स्पष्ट केले
आजच्या सभेचे प्रस्ताविक घनश्याम शेलार यांनी केले यावेळी त्यांनी विविध प्रश्न मांडताना आमदार अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आमचे कामे होऊ देत नसल्याचा आरोप केला तसेच इथून पुढे शेवटच्या श्वासापर्यत अजित पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे सांगितले
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी डिबे माणिकडोह बोगदा, सिसपे कुकडी पाणीप्रश्न असे वेगवेगळे मुद्दे मांडले
माजी आमदार राहुल जगताप यांनी आ विक्रमसिंह पाचपुते यांच्यावर सडकून टीका करत बनावट पनीर वर आवाज उठवणारेच बोगस दुधाचे जनक आहेत गुटखा बंद करा म्हणणारेच काष्टीकर गुटख्याचे हप्ते घेतात अशी टीका जगताप यांनी केली
आण्णासाहेब शेलार यांनी त्यांच्या खास गावरान शैलीत केलेल्या भाषणाने सभास्थळी एकच हश्या पिकला विधानसभेला मला वाटलं होत तीन दादांच्या मध्ये माझं जुळून जाईन पण ३०टक्क्याचा आमदार झाला राजेंद्र नागवडे राहुल जगताप यांच्या कडे बघून तुम्ही दोघे मोठा घास घेऊ नका नाहीतर आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांची गोची होते असे म्हणत या दोघांना मुंबईची जबाबदारी द्या म्हणजे हे कायम एकत्र राहतील असा टोमणा शेलार यांनी नागवडे आणि जगताप यांना लगावला तसेच आजच्या सभेचे नियोजन मी केले तर आर्थिक नियोजन दत्ता पानसरे यांनी केल्याचे सांगून इथून पुढ सुद्धा पक्षाचा खर्च पानसरे करणार असल्याचे सांगत इतर नेत्यांना चांगलाच टोला लगावला
सभेच्या शेवटी संभाजी ब्रिगडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि नानासाहेब शिंदे यांनी कांद्याच्या माळा दाखवत दूधप्रश्न आणि कांदा प्रश्नावर बोला असे सांगत पवार यांचे लक्षवेधले त्यावर अजित पवार यांनी त्यांना इथं काय सवाल जवाब चाललेला नाही माझं झाल्यावर बोला असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या दोघांना बाजूला नेले
आजच्या सभेसाठी आ संग्राम जगताप, आ काशिनाथ दाते,माजी आमदार रमेश थोरात, चंद्रशेखर घुले,लहू कानडे, शिवाजीराव गर्जे,बाळासाहेब नाहाटा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
....असलं वागण बर नव्ह...श्रीगोंद्यात अजित दादांचे नेत्यांना खडेबोल सुनावत कानपिचक्या,तर नेत्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २९, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २९, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: