ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार... सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाईची मागणी, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार!

 


प्रशासक न्यूज,दि.२८ऑगस्ट२०२५

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आणि नाहाटा यांच्या पत्नी सौ मनीषा नाहाटा सरपंच असलेल्या लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याबाबतचा विस्तार अधिकारी यांचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या सरपंच मनीषा नाहाटा यांना अपात्र ठरवून ग्रामसेवक प्रवीण कराळे यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी लोणी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे, ऍड बाळासाहेब काकडे, संतोष गोरखे,भाजप तालुकाध्यक्ष अजित काकडे यांनी आज श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्राकार परिषदेत केली

तसेच बाळासाहेब नाहाटा हे ग्रामपंचायतीचे सदस्य देखील नाहीत त्यांच्या पत्नी सरपंच असताना सुद्धा नाहाटा हेच ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असून अधिकाऱ्यांवर ते दबाव टाकून त्यांना काम करू देत नसल्याचा आरोप यावेळी त्यांच्यावर करण्यात आला
सामाजिक वनिकरण चा वृक्षतोड परवाना देण्यासाठी नाहाटा यांच्या खात्यावर सदर ठेकेदाराने कमिशन स्वरूपात ८५हजार रुपये जमा केल्याचा आरोप करत त्या व्यवहाराचा पुरावा यावेळी सादर करण्यात आला यावेळी लोणी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करणाऱ्या चौकशी अधिकारी यांचा चौकशी अहवाल पत्रकारांना देण्यात आला यामध्ये लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीने चौकशीकामी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिलेले नसल्यामुळे मला चौकशी करता आलेली नाही तसेच चौकशीच्या अनुषंगाने माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव येत असून चौकशी काढून घेण्याची मागणी चौकशी अधिकारी एस आर हराळ यांनी पंचायत समितीकडे केली आहे

चौकशी अधिकारी हराळ यांनी दिलेल्या अहवालात लोणी ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्यात ५२,७८५रुपयांची वित्तीय अनियमितता असल्याचे सांगितले आहे तसेच बाजार लिलावाची १,७३,०००रुपये ही रक्कम दोन वर्ष्याच्या कालावधीत कॅशबुक किंवा पावती पुस्तकात कुठेही जमा झाल्याचे निदर्शनास आलेले नाही तसेच ग्रामनिधी मध्ये २६,२७,३८३ रुपयांची अनियमितता आढळून आली आहे याबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून खुलासा मागवण्यात यावा असे मत मांडत अनेक बाबींवर त्यांनी या चौकशी अहवालात ठपका ठेवला आहे
चौक सुशोभीकरण झालेले नसताना त्यावर ५लाख २०हजार रुपये खर्च दाखवण्यात आला आहे लाकडे तोडण्याचा परवाना बेकायदेशीर पद्धतीने देण्यात आला असून त्यात ७४एकरात फक्त ४३७ झाडे ३००टन वजनाचे लाकूड तोडल्याचे दाखवण्यात आले असून या वृक्षतोडीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत ऍड बाळासाहेब काकडे यांनी केला
 बाळासाहेब नाहाटा हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्यामुळे सदर चौकशी अहवाल श्रीगोंदा पंचायत समितीने जिल्हा परिषदेला सादर केलेला असताना सुद्धा सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप ऍड काकडे यांनी केला आहे आजच्या पत्रकार परिषदेसाठी या पत्रकार परिषदेसाठी दादासाहेब मडके, संदीप डांगे, रविंद्र डांगे,धनंजय रोडे हे उपस्थित होते

*उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार*
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या श्रीगोंद्यात सभा घेणार आहेत यावेळी त्यांना भेटून लोणी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडून चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या सरपंच मनीषा नाहाटा आणि ग्रामसेवक कराळे यांच्यावर कारवाई सह अहवाल प्राप्त होऊन सुद्धा कारवाई न करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे राजेंद्र काकडे यांनी सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच बाळासाहेब नाहाटा यांची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार समोर आल्यामुळे आणि त्यांच्या पत्नी सरपंच मनीषा नाहाटा यांच्यावर कारवाईची मागणी झाल्यामुळे नाहाटा यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे




ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार... सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाईची मागणी, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार! ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार... सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाईची मागणी, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार! Reviewed by Prashasak on ऑगस्ट २८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.