बाळाला घेऊ नकोस म्हणाल्याचा राग....मारहाणीत एकाचा मृत्यू...श्रीगोंदा तालुक्यातील घटना!


प्रशासक न्यूज,दि.१९ऑक्टोबर२०२५

तू दारु पिला आहेस त्यामुळे तू लहान बाळाला घेऊ नकोस असे सांगितल्याचा राग अनावर झाल्यामुळे लाकडी बांबूने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील वाघ वस्ती येथे घडली आहे सदर मारहाण दि १३ऑक्टोबर २०२५रोजी करण्यात आली होती मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा दि. १७ऑक्टोबर रोजी पुणे येथे ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्यानंतर काल दि. १८ऑक्टोबर रोजी या घटनेबाबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर घटनेबाबत माहिती अशी कि दि १३ रोजी दुपारी या घटनेतील मयत झालेले शिवाजी विठ्ठल वाघ वय ७१ यांनी त्यांच्या पुतण्याचा मुलगा विशाल राजू वाघ याला तू दारू पिला आहेस त्यामुळे आता लहान बाळाला घेऊ नकोस असे सांगितले त्याचा राग अनावर झाल्यामुळे विशाल राजू वाघ आणि त्याचे वडील राजू विठ्ठल वाघ यांनी शिवाजी वाघ यांना लाकडी बांबूने जबर मारहाण केली होती या मारहाणीत शिवाजी वाघ गंभीर जखमी झाले होते तें ससून रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला

त्यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा मुलगा दीपक शिवाजी वाघ यांच्या फिर्यादीवरून राजू वाघ व विशाल वाघ या बाप लेका विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

पोलीस पुढील तपास करत आहेत
बाळाला घेऊ नकोस म्हणाल्याचा राग....मारहाणीत एकाचा मृत्यू...श्रीगोंदा तालुक्यातील घटना! बाळाला घेऊ नकोस म्हणाल्याचा राग....मारहाणीत एकाचा मृत्यू...श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर १९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.