प्रशासक न्यूज,दि.२०ऑक्टोबर२०२५
श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रभागाबाहेरील एकाच समुदायाच्या अनेक मतदारांची नावे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून समाविष्ट केल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी केला आहे.
रमेश लाढाणे यांनी प्रभागाबाहेरील मतदारांवर नगरपालिकेकडे हरकत दाखल करताना विशिष्ट समुदायाचीच नावे कुठलाही रहिवासी पुरावा नसताना इतर प्रभागातील व तालुक्यातील मतदारांची नावे विशिष्ट हेतूने समाविष्ट कशी झाली असा सवाल केला असून यामुळे स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवार व मतदारांवर ही बाब अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.रमेश लाढाणे यांनी हरकतीद्वारे प्रभागा बाहेरील हरकत घेतलेल्या सर्व मतदारांची नावे वार्ड क्रमांक पाच मधून वगळण्यात यावीत अशी हरकत दाखल केली आहे यावर नगरपालिका प्रशासनाने योग्य कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
प्रशासनातील ते अधिकारी कोण?
माजी उपनगराध्यक्ष लाढाणे यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रभागाबाहेरील एकाच समुदायाची अनेक नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप केला आहे त्यामुळे अश्या प्रकारे मतदार यादीत घोळ घालणारे अधिकारी कोण आणि ही नावे समाविष्ट करण्यासाठी कुणी आग्रह धरला हे सर्वांसमोर येणे गरजेचे आहे
"अधिकाऱ्यांना" हाताशी धरून घोटाळा... माजी उपनगराध्यक्षांचा गंभीर आरोप!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २०, २०२५
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: