प्रशासक न्यूज,दि.२४ऑक्टोबर२०२५
श्रीगोंदा तालुक्यात सुरु झालेले चोऱ्यांचे सत्र थांबवण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी ठरत आहेत दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावात चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते ती घटना ताजी असतानाच आज मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काष्टी गावात चोरट्यानी पुन्हा धुमाकूळ घालत लूट केली ऐन सणासुदीत चोऱ्यांचे सत्र सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
आज रात्री साडेबाराच्या दरम्यान काष्टी गावातील संतवाडी येथे चोरट्यानी हैदोस घातला काष्टीचे माजी उपसरपंच पोपट आबा पाचपुते यांच्या घरी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची बोरमाळ ही चोरट्यांनी पळवली. त्या ठिकाणाहून त्यांचा मोर्चा थेट बबनराव भोसले यांच्या घराकडे आला, त्या ठिकाणी त्यांची एक खोली उघडून भरत भोसले यांच्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले त्या ठिकाणावरून अरुण भोसले यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी भाऊबीजेसाठी आली होती रात्री झोपताना तिने गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण तिच्या पर्समध्ये ठेवून पर्स घरामध्ये ठेवली होती. ती पर्स चोरट्यांनी पळवली त्यानंतर चोरट्यांचा मोर्चा पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र पाचपुते यांच्या घराकडे गेला त्या ठिकाणी राजेंद्र पाचपुते यांच्या चिरंजीवाला कोयत्याचा धाक दाखवून चांदीच्या तीन अंगठ्या त्या ठिकाणावरून त्यांनी हस्तगत केल्या. हा सगळा प्रकार ज्यावेळेला घडत होता त्यावेळेला संतवाडी परिसरामध्ये जोरदार पाऊस चालू होता. सदर चोऱ्यानबाबत फोनवर माहिती मिळताच काष्टी गावातील दीपक पाटील भोसले यांनी काही नागरिकांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु पावसामुळे त्यात यश आले नाही. सर्व लोकांच्या घराच्या अवतीभवती ऊसाचे मोठे क्षेत्र आहे त्याचा फायदा उचलत चोरटे या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेमिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांची बोलीभाषा ही हिंदी होती ,परंतु त्यामध्ये परिसरातील स्थानिक लोक सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांना माहिती दिल्यानंतर सकाळी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला
सदर चोऱ्याच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे
दुपारपर्यत सदर चोरीबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता
"पोलीस" अपयशी...कार्यपद्धतीवर नाराजी,नागरिकांमध्ये भीती.. या गावात पुन्हा धुमाकूळ!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २४, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २४, २०२५
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: