"दशक्रियाविधी घाट" परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य... 'काकस्पर्शास' अडथळा..श्रीगोंदा नगरपरिषदेचे दुर्लक्ष!
प्रशासक न्यूज,दि.२०फेब्रुवारी२०२६
विशाल चव्हाण
माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्या दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडास कावळ्याने स्पर्श केल्यानंतर मयत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आणि प्रथा आहे
श्रीगोंदा शहरातील दशक्रिया विधी घाट परिसराला अस्वच्छतेने विळखा घातल्यामुळे आणि शहरातील गटारीचे घाण पाणी सरस्वती नदीला सोडण्यात आल्यामुळे श्रीगोंदा शहरात होणाऱ्या दशक्रिया विधीवेळी काकस्पर्श होण्यास अडथळा निर्माण झाला आहे दशक्रिया विधी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असताना सुद्धा आणि त्या ठिकाणी गटारीच्या पाण्याचे डबके साचलेले असून सुद्धा तेथील स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्याकडे श्रीगोंदा नगरपरिषद डोळेझाक करत असल्यामुळे याबाबत श्रीगोंदा ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
मागील काही वर्षात काकस्पर्श होत नसल्याच्या कारणातून श्रीगोंदा शहरातील अनेक दशक्रिया विधी बाहेरगावी जाऊन करण्यात येत होते शहरातील दशक्रिया विधी शहरातच व्हावेत यासाठी शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी एकत्रित येत काकस्पर्श समिती स्थापन करून श्रीगोंदा शहरातील दशक्रिया विधी घाट परिसरात काकस्पर्श होण्यासाठी मोठी मेहनत घेतली या परिसरात कावळे यावेत यासाठी कृत्रिम दशक्रिया विधी करणे,स्पीकरवर कावळ्याचा मोठ्याने आवाज काढणे यासह अनेक प्रयोग या काकस्पर्श समितीच्या माध्यमातून या ठिकाणी राबविण्यात आले त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून या ठिकाणी काकस्पर्श होण्यास सुरुवात झाली होती त्यातूनच त्यांनी केलेल्या आव्हानातून अनेक लोकांनी गावातच दशक्रिया विधी करण्यास सुरुवात केली बाहेर जाणारे दशक्रिया विधी गावातच होऊ लागल्यामुळे लोकांचा वेळ आणि पैशाची बचत होऊ लागली परंतु दशक्रिया विधी परिसरात गटारीच्या पाण्याचे साचलेले डबके आणि मोठ्या प्रमाणात झालेला कचरा या ठिकाणी वाढलेले गवत या सर्व घाणीच्या साम्राज्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी काकस्पर्श होण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे
आज एका दशक्रिया विधीच्या दरम्यान काकस्पर्श समितीचे सदस्य बाळू बाजीराव खेतमाळीस यांनी या अस्वच्छतेबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत मागील अनेक वर्षांपासून या समस्येकडे नगर परिषदेचे लक्ष वेधून देखील नगरपालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप केला तसेच घाण पाणी आणी अस्वच्छ ठिकाणी कावळे येत नाहीत त्यामुळे दशक्रियाविधी घाट परिसरात नगरपरिषदेने स्वच्छता राबवण्याचे त्यांनी विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष आणि नगरपालिका प्रशासनाला आवाहन केले आहे
शेख महंमद महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटील यांनी सुद्धा या समस्येवर नाराजी व्यक्त करत नगरपरिषदेने गटारीचे घाण पाणी बंद पाईप लाईन द्वारे शहराबाहेर सोडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले
श्रीगोंदा शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांनी शहर स्वच्छतेवर भर दिला असला तरी वरवर स्वच्छता करून चालणार नाही तर शहरातील मुख्य भागातील अस्वच्छतेवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे जरुरी आहे त्यामुळे आता तरी दशक्रिया विधी घाट परिसराला अस्वच्छतेचा पडलेला विळखा हटवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
"दशक्रियाविधी घाट" परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य... 'काकस्पर्शास' अडथळा..श्रीगोंदा नगरपरिषदेचे दुर्लक्ष!
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १९, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १९, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: