'ते' तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे बळी..."त्याच्यावर" गुन्हा दाखल करा..या ग्रामस्थांचा संताप आणि...


प्रशासक न्यूज,दि.१९फेब्रुवारी२०२६

वारंवार होत असलेले अपघात त्यात निष्पाप लोकांना गमवावा लागणारा जीव आणि त्याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत दौंड नगर रस्त्यावर काष्टी गावात सतत अपघात होत असताना सुद्धा संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी आता काष्टी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत दि.५मार्च रोजी नगर दौंड महामार्गांवर काष्टी येथे 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा ईशारा दिला असून त्याबाबतचे निवेदन त्यांनी आज श्रीगोंदा प्रशासनाला दिले आहे

निवेदन देताना काष्टी येथील कैलास तात्या पाचपुते,काष्टी सोसायटीचे अध्यक्ष राकेश पाचपुते,अनिल मामा पाचपुते,प्रा.सुनील माने हे उपस्थित होते

दोन दिवसापूर्वीच काष्टी येथील सचिन माने आणि संतोष माने या दोन सक्ख्या भावांचा अपघातात करून अंत झाला होता माने बंधू च्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन त्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे डिसेंबर २०१९साली देखील काष्टीचे माजी सरपंच पोपट माने यांचा देखील काष्टी येथील शिवनेरी चौकात असाच रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे आता इथून पुढच्या काळात या अपघातांना ब्रेक लागावा यासाठी काष्टी गावातील श्रीगोंदा चौक,अजनुज चौक,शिवनेरी चौक या भागात शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवावेत,अपघात टाळण्यासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था करून रेडीयम बोर्ड लावावेत,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा भाग कायमस्वरूपी ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करावा त्यावर उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश असून त्याची पूर्तता न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा ईशारा देण्यात आला आहे त्यामुळे आता तरी प्रशासना कडून वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात कि काष्टी ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागणार हे येणाऱ्या काही दिवसात समजणार आहे
'ते' तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे बळी..."त्याच्यावर" गुन्हा दाखल करा..या ग्रामस्थांचा संताप आणि...  'ते' तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे बळी..."त्याच्यावर" गुन्हा दाखल करा..या ग्रामस्थांचा संताप आणि... Reviewed by Prashasak on फेब्रुवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.