प्रशासक न्यूज,दि.२मार्च२०२६
पाच लाख रुपयात अडीचशे ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील पाच लाख रुपये रोख रक्कम,दोन मोबाईल फोन,महत्वाची कागदपत्रे,एटीएम कार्ड असा सर्व मुद्देमाल लुटून नेल्याची घटना दि.२८फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील सिक्रेट हार्ट इंग्लिश मेडीयम स्कुलच्या समोरील मोकळ्या मैदानात घडली होती
ड्राफ्ट(स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणे)या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती त्यानंतर स्वस्तात सोने देण्याच्या घटनेत फसवणूक झालेल्या पुणे जिल्ह्यातील कडाचीवाडी,चाकण,ता खेड येथील राहिवासी असलेल्या अविनाश दिनकर शिंदे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता फिर्यादित म्हंटल्या प्रमाणे फिर्यादी व त्याचे साथीदार नरेंद्र ठाकूर या दोघांना काही लोकांनी त्यांचा विश्वास संपादन करून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून कोळगाव शिवारात बोलावले होते परंतु सदर ठिकाणी गेल्यानंतर अनोळखी महिला व दहा बारा जणांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण करून लुटले होते
या गुन्ह्याचे गंभीर्य ओळखून बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर ठिकाणच्या परिस्थितीवरून आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने कोळगाव येथील कोळाई देवी मंदिराच्या जवळ दोन संशयितांना पाठलाग करून पकडले त्यांच्याकडे नाव गाव विचारले असता निजाम जलद्या काळे रा पारगाव आणि सुयोग बाजऱ्या काळे रा कोळगाव अशी असल्याचे समजले पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे काही रक्कम मिळून आली पोलीस तपासात त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी या दोन्ही आरोपीना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील उर्वरित आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून सर्व आरोपी लवकरच जेरबंद केले जातील असे बेलवंडी पोलिसांनी सांगितले आहे
बेलवंडी पोलिसांनी सदर घटनेचा २४ तासाच्या आत छडा लावत दोन आरोपी जेरबंद केल्यामुळे त्यांच्या कारवाईचे कौतुक होत आहे
बेलवंडी पोलिसांनी सदर घटनेचा २४ तासाच्या आत छडा लावत दोन आरोपी जेरबंद केल्यामुळे त्यांच्या कारवाईचे कौतुक होत आहे
'बेलवंडी' पोलिसांची धडाकेबाज कारवाई...२४ तासाच्या आत दोन आरोपी जेरबंद!
Reviewed by Prashasak
on
मार्च ०१, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च ०१, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: