प्रशासक न्यूज,दि.३मार्च२०२६
श्रीगोंदा शहरात आज घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे महाविद्यालयीन तरुणीसमोर एका तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे
श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर परिसरात एका खोलीत राहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीकडे एक तरुण आज दुपारच्या सुमारास आला होता त्यानंतर काही वेळातच या तरुणाने आत्महत्या करत स्वतःची जीवनयात्रा संपवली तरुणीसमोर तरुणाने आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाच या घटनेने मोठा धक्का बसला आहे घटनेबाबत माहिती समजताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर तरुणाला उपचारासाठी श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी सदर तरुणाला मयत घोषित केले
तरुणाची तरुणी समोर आत्महत्या..श्रीगोंद्यातील घटनेने खळबळ!
Reviewed by Prashasak
on
मार्च ०३, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च ०३, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: