प्रशासक न्यूज,दि.३मार्च२०२६
श्रीगोंदा शिरूर रस्त्यावर एसटी वाहन चालक आणि वाहक यांच्यावर होणारे हल्ले त्यांना होणारी मारहाण या घटना काही केल्या थांबताना दिसत नसल्याचेच चित्र बघायला मिळत आहे मागील काही महिन्यात या मार्गांवर एसटी वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना सातत्याने घडतं आहेत त्याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद देखील होत आहे परंतु मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात कुठलीच ठोस कारवाई होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे
बस थांब्यापासून पुढे गेलेल्या एसटीला पाठीमागून हात दाखवून ती एसटी न थांबल्याच्या रागातून आज एका एसटी चालकाला कॉलर पकडून मारण्याची धमकी देत चालकाच्या अंगावर ऑईल टाकले ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर चौफुला या ठिकाणी आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे सदर घटनेबाबत एसटी चालक उद्धव भास्कर होडशीळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादासाहेब चांगदेव ओहोळ वय ४० रा.पिंप्री कोलंदर यांच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे
चालक होडशीळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज सकाळी पावणे नऊ वाजता ते एम एच १४ बीटी ३५१९ ही एसटी बस श्रीगोंदा शिरूर रस्त्यावर घेऊन जात असताना पिंप्री कोलंदर चौफुला येथे दुचाकी क्रं एम एच १६ ७४८ या टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने दुचाकी एसटी बस ला आडवी लावून बस मध्ये चढून गाडी का थांबवली नाही असे म्हणत चालकाच्या अंगावर ऑईल चा ड्रम ओतला आणि बघून घेण्याची धमकी दिली
श्रीगोंदा शिरूर रस्त्यावर घडणाऱ्या या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी एसटी चालक वाहक कर्मचाऱ्यांनी केली आहे
"चालकावर"ऑईल चा ड्रम ओतला...श्रीगोंदा तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले सुरूच...!
Reviewed by Prashasak
on
मार्च ०३, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च ०३, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: