"पोहण्यासाठी" गेलेल्या तरुणाचा २४ तासानंतरही शोध लागेना...ग्रामस्थांचे शोधकार्य सुरूच,श्रीगोंदा तालुक्यातील घटना


प्रशासक न्यूज,दि.१४मार्च२०२६

काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहोण्यासाठी गेलेल्या ३०वर्षीय तरुणाचा २४ तास उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्याप शोध लागलेला नाही श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगावपिसा या गावातील एक तरुण काल दुपारी एक वाजता कुकडी कालवा (हंगा जलसेतू) या ठिकाणी पोहोण्यासाठी गेला होता परंतु हंगा जलसेतू येथे पोहणारा तरुण काल पासून कुठेच मिळून न आल्यामुळे तरुणाचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत नातेवाईक पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने सदर तरुणाचा शोध घेत आहेत 

परंतु कुकडी कालवा फुल भरून वाहत असल्यामुळे तरुणाच्या शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे सदर घटनेबाबत ग्रामस्थांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्याशी संपर्क साधता तरुणाचा शोध लागेपर्यत कुकडी कालव्याचे पाणी बंद करावे अशी विनंती केली काही कार्यकर्त्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता घोरपडे यांच्याशी संपर्क साधला आणि पाणी बंद करण्याची विनंती केली परंतु घोरपडे यांनी मंत्रालयातील वरिष्ठ पातळीवरून पाणी बंद करण्याचा आदेश असल्या शिवाय पाणी बंद करता येणार नसल्याचे सांगितले सदर तरुणाचा शोध घेण्यासाठी पिंपळगाव येथील ग्रामस्थ कालपासून अथक प्रयत्न करत आहेत
परंतु पोहोयाला गेलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही
"पोहण्यासाठी" गेलेल्या तरुणाचा २४ तासानंतरही शोध लागेना...ग्रामस्थांचे शोधकार्य सुरूच,श्रीगोंदा तालुक्यातील घटना "पोहण्यासाठी" गेलेल्या तरुणाचा २४ तासानंतरही शोध लागेना...ग्रामस्थांचे शोधकार्य सुरूच,श्रीगोंदा तालुक्यातील घटना Reviewed by Prashasak on मार्च १३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.