पोलिसांच्या शासकीय वाहनाला अपघात....ट्रकचालक ताब्यात!


प्रशासक न्यूज,दि.२१मार्च२०२६

काल दि २० रोजी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना श्रीगोंदा पोलिसांच्या शासकीय वाहनाला अपघात झाल्याची घटना तालुक्यातील घोगरगाव या गावात घडली

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे वाहन चालक साळवे यांच्यासह रात्री घोगरगाव परिसरात शासकीय वाहन क्रं एम एच१६,डीजी ५९८०या वाहनातून गस्त घालत होते त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रं जिजे ३६,टी ४१७७ याने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिली या धडकेत शासकीय वाहनाचे किरकोळ नुकसान झाले परंतु सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही

अपघातानंतर पोलिसांनी सदर ट्रकसह चालकाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले आहे
पोलिसांच्या शासकीय वाहनाला अपघात....ट्रकचालक ताब्यात! पोलिसांच्या शासकीय वाहनाला अपघात....ट्रकचालक ताब्यात! Reviewed by Prashasak on मार्च २०, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.