"खंडणी"देण्यास विरोध करणाऱ्या व्यावसायिक 'महिलेला' जबर मारहाण....ग्रामस्थ संतापले..गावबंद बाबत बैठकीचे आयोजन!
प्रशासक न्यूज,दि.२२मार्च२०२६
ही जागा माझ्या ताब्यात आहे या जागेत तुझी आयस्क्रीम ची गाडी(दुकान)लावायची असेल तर मला महिन्याला पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत खंडणी देण्यास विरोध करणाऱ्या आयस्क्रीम विक्रेत्या महिलेला लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यानी जबर मारहाण केल्याची घटना काल दि २१ रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पारगाव रस्त्यावरील महात्मा फुले उद्याना समोर घडली आहे
सदर घटनेबाबत पूनम दिनेश शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या बाहुल्या गुलाब काळे त्याची आई संगीता काळे बायको आणि दोन अनोळखी महिला सर्व राहणार श्रीगोंदा अश्या पाच जणांविरोधात जबर मारहाण करणे खंडणी मागणे अश्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
काल रमजान ईद सण असल्यामुळे फिर्यादी सौ शिंदे यांचे पती शेख महंमद महाराज मंदिरात गेले होते तेव्हा त्यांच्या पत्नी पूनम शिंदे या भरकादेवी या त्यांच्या आयस्क्रीम च्या दुकानावर होत्या त्याचवेळी त्या एकट्या असल्याचे पाहून अंगातील कपडे काढून हातात लोखंडी गज घेऊन उद्याना शेजारी राहणारा बाहुल्या गुलाब काळे हा इसम आला त्याच्या मागे त्याची आई बायको आणि इतर दोन अनोळखी महिला देखील आल्या त्यानंतर तुला जर इथं तुझी भरकादेवी आयस्क्रीम चे दुकान लावायचे असेल तर आम्हाला पन्नास हजार रुपये महिन्याला द्यावे लागतील ही जागा माझ्या ताब्यात आहे असे म्हणत त्याने आयस्क्रीम विक्रेत्या व्यावसायिक पूनम शिंदे यांना धमकावले त्यावर शिंदे यांनी ही जागा तुमची नसून श्रीगोंदा नगरपरिषदेची आहे असे सांगितले त्याचा राग आल्यामुळे बाहुल्या काळे याने शिंदे यांना लोखंडी गजाने हातावर पाठीवर कंबरेवर मारहाण करत दुखापत केली त्यानंतर बाहुल्याची आई बायको आणि दोन महिलांनी शिंदे यांना खाली पाडून लाथा बुक्क्यानी मारहाण केली आरडा ओरडा केल्यानंतर त्या भागात असणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या मारहाणीतून सौ शिंदे यांना वाचवले त्यानंतर या आरोपीनी पुन्हा तू आम्हाला पन्नास हजार रुपये दिले नाही तर आम्ही तुम्हाला इथं दुकान लावून देणार नाही तुला आणी तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली
ग्रामस्थांमध्ये संताप,बैठकीचे आयोजन
या घटनेची माहिती समजताच रात्री उशिरा मोठ्या संख्येने जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता तसेच आरोपीना अटक करून कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली तसेच या भागात राहणाऱ्या या लोकांकडून अनेकदा सामान्य लोकांना मोठा त्रास होत असल्याच्या निषेधार्थ गावबंद ठेवण्याबाबत आज श्रीगोंदा शहरातील महंमद महाराज मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या मारहानीचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे
या घटनेची माहिती समजताच रात्री उशिरा मोठ्या संख्येने जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता तसेच आरोपीना अटक करून कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली तसेच या भागात राहणाऱ्या या लोकांकडून अनेकदा सामान्य लोकांना मोठा त्रास होत असल्याच्या निषेधार्थ गावबंद ठेवण्याबाबत आज श्रीगोंदा शहरातील महंमद महाराज मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या मारहानीचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे
"खंडणी"देण्यास विरोध करणाऱ्या व्यावसायिक 'महिलेला' जबर मारहाण....ग्रामस्थ संतापले..गावबंद बाबत बैठकीचे आयोजन!
Reviewed by Prashasak
on
मार्च २१, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २१, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: