'गुन्हेगारांमध्ये' एवढी हिंम्मत येते कुठून?दहशतीचे वातावरण..दोन्ही हात तोडले...राजकीय वाद आणि परस्पर तक्रारी जीवावर बेतले...!

(AI इमेज)
प्रशासक न्यूज,दि.१२जुलै२०२६
विशाल अ चव्हाण

श्रीगोंदा शहरातील गणपती मळ्याच्या पुढे सुपेकर वस्ती येथे काल दुपारी चार ते सव्वा चार वाजण्याच्या सुमारास तलवार हल्ल्याचे रक्तरंजित नाट्य घडले एका व्यक्तीवर जवळपास सहा लोकांनी तलवार आणि धारधार हत्यारांनी हल्ला करत त्या व्यक्तीचे मनगटापासून दोन्ही हात तोडले त्याच्या कपाळावर डोक्यावर गंभीर जखमा करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे ही घटना भरदिवसा श्रीगोंदा मांडवगण रस्त्याच्या बाजूला घडली जीव वाचवण्यासाठी सदर इसम रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरात घुसला त्या घरात फक्त तीन महिला होत्या त्यातील एका वयस्कर महिलेचे ऑपरेशन झालेले होते ती महिला या हल्लेखोरांना थांबवत होती माझं ऑपरेशन झालंय माझ्या घरात असं करू नका म्हणत होती पण बदल्याच्या भावनेने पेटून उठलेल्या हल्लेखोरांनी काही एक न ऐकता कुठलीही परवा न करता त्या व्यक्तीवर त्या महिलांच्या समोर त्यांच्या घरात सपासप तलवारीने वार केले या भयानक हल्ल्यात तो व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला सगळ्या घरात रक्ताचा सडा पडला होता डोळ्या देखत झालेला हा भीषण हल्ला पाहून त्या घरातील एक महिला बेशुद्ध झाली

या सर्व घटनेमुळे लोकांमधील वाढत चाललेल्या क्रूर मानसिकतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे कायद्याचा लोकांना धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय या प्रकरणी सहा हल्लेखोरां विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी काल रात्रीच एका व्यक्तीला ताब्यात देखील घेतल्याची माहिती समजली आहे उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके सक्रिय झाले आहेत


घटनास्थळी कर्जत उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सुजिकुमार क्षीरसागर,श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट देऊन वेगवान तपास सुरु केला आहे

रोहिदास हरिश्चंद्र दांगडे वय ४८ रा घुगल वडगाव असे कालच्या तलवार हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांच्यावर पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या हातावर आज पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजतं आहे

सदर हल्ल्याप्रकरणी दांगडे यांची मुलगी राधिका दांगडे हिने काल श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून परशुराम सुभाष दांगडे,अभयराज संजय दांगडे,सागर उर्फ प्रदीप सुनील दांगडे,दत्तात्रय गोविंद दांगडे,विक्रम तुळशीराम दांगडे,संग्राम उर्फ तात्याराम ज्ञानदेव पवार सर्व रा.घुगल वडगाव या सहा जणांविरोधात विविध कलमानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

फिर्यादित म्हंटल्याप्रमाणे जखमी रोहिदास दांगडे आणि त्यांच्या भावकीतील अभयराज संजय दांगडे यांच्यात मागील पाच वर्ष्यापासून राजकीय वाद सुरु होता त्यातून यापूर्वी त्यांच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या काल रोहिदास दांगडे हे कांद्याच्या गोण्या घेऊन दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंद्यावरून त्यांच्या घरी घुगल वडगाव येथे जाण्यासाठी निघाले असता गणपती मळ्याच्या परिसरात सुपेकर वस्ती येथे त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या वरील सहा जणांनी त्यांच्या दुचाकीला आडवी दुचाकी लावून याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणत त्यांच्यावर हल्ला केला यावेळी हल्लेखोरांच्या हातात तलवारी आणि हत्यारे होती घाबरलेल्या रोहिदास दांगडे यांनी दुचाकी सोडून तिथून पळ काढत रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात आश्रय घेतला हल्लेखोरांनी त्या ठिकाणी येऊन दांगडे यांच्यावर तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात रोहिदास दांगडे यांचे दोन्ही हात मनगटापासून तुटले त्यांच्या कपाळा ला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे

काल झालेल्या या भयानक हल्ल्यामुळे शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले असून हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे
'गुन्हेगारांमध्ये' एवढी हिंम्मत येते कुठून?दहशतीचे वातावरण..दोन्ही हात तोडले...राजकीय वाद आणि परस्पर तक्रारी जीवावर बेतले...! 'गुन्हेगारांमध्ये' एवढी हिंम्मत येते कुठून?दहशतीचे वातावरण..दोन्ही हात तोडले...राजकीय वाद आणि परस्पर तक्रारी जीवावर बेतले...! Reviewed by Prashasak on जुलै ११, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.