'रात्रीच्या' वेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई!..संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संपर्क करा...पो नि ठेंगे यांचे नागरिकांना आवाहन....
प्रशासक न्यूज,दि.२६ जून २०२६
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वाहन चालकांसह पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन दंगा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगरल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्या लोकांकडे वळवला आहे रात्रीच्या वेळी नागरिकांना अश्या काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन ठेंगे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील लोकांना केले आहे
ठेंगे यांनी रात्रीच्या वेळेस विनाकारण संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या लोकांकडे आपला मोर्चा वळवत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे रात्रीच्या वेळेस होणाऱ्या गुन्हेगारी घटना,चोरी,घरफोडी दरोडा या सारख्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे त्यामुळे ठेंगे यांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत रात्रीच्या वेळी त्यांच्या भागात अश्या काही संशयित व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधणे जरुरी आहे
श्रीगोंदा पोलिसांना काल दि.२५ रोजी रात्री गस्त घालत असताना ११ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील साळवणदेवी रस्त्यावर एम एच १७,सी एम ५८५८ या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ब्रिझा कार संशयास्पद स्थितीत उभी असलेली दिसली पोलिसांनी गाडीत बसलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गाव महेंद्र गंडीच्या काळे रा.धालवडी ता.कर्जत असे असल्याचे पोलिसांना सांगितले सदर ठिकाणी तू का थांबलास अशी पोलिसांनी विचारणा केली असता या व्यक्तीने पोलिसांना उडवा उडवी ची उत्तरे दिले त्याला तिथे थांबण्या चे कुठलेही ठोस कारण सांगता आले नाही संशय आल्यामुळे पोलिसांनी ब्रिझा गाडी ची तपासणी केली असता गाडीत एका प्लास्टिक पिशवीत मिरची पावडर आढळून आली याबाबत सुद्धा सदर व्यक्तीला कुठलेच संयुक्तिक उत्तर देता न आल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत हा व्यक्ती काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या हेतूने स्वतःचे अस्तित्व लपवताना त्या ठिकाणी मिळून आल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो हे कॉ आप्पा तरटे हे करत आहेत श्रीगोंदा पोलिसांनी सदर कारवाई केली असून रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याचा कडक इशारा या कारवाई तून पोलिसांनी दिला आहे
'रात्रीच्या' वेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई!..संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संपर्क करा...पो नि ठेंगे यांचे नागरिकांना आवाहन....
Reviewed by Prashasak
on
जून २६, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून २६, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: